ISRO Xposat Mission : इस्रोने आज सकाळीच PSLV C58 ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. यामध्ये XPoSat या मुख्य उपग्रहासह अन्य छोटे छोटे उपग्रह देखील अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे 20 मिनिटांमध्ये एक्सपोसॅट उपग्रह आपल्या कक्षेत सोडण्यात आला. यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्यात आले.
ब्रह्मांडातील कृष्णविवरे (ISRO Black hole mission) , न्यूट्रॉन तारे, पल्सार आदी ‘क्ष-किरण’ स्रोतांच्या अभ्यासासाठी ‘एक्स्पोसॅट’ या पहिल्या भारतीय अंतराळ वेधशाळेचे प्रक्षेपण करण्यात आले. एक्स्पोसॅटमधील ‘पी-३०’ या सूक्ष्म उपग्रहाच्या प्लॅटफॉर्मची कार्यक्षमता आणि प्रणालीचे प्रमाणीकरण करण्यासाठी हैदराबादस्थित ध्रुव स्पेस हे ‘स्टार्टअप’ मदत करणार आहे. प्रथमच एका भारतीय ‘स्टार्टअप’ने अंतराळ मोहिमेसाठी सॉफ्टवेअर आधारित प्रणाली विकसित केली आहे. (ISRO Mission 2024)
‘एक्स्पोसॅट’ बरोबरच इतर छोट्या उपग्रहांचेही प्रक्षेपण ‘पीएसएलव्ही-सी ५८’द्वारे करण्यात आलं. प्रक्षेपकाच्या चौथ्या टप्प्यात ठेवलेले हे उपग्रह पृथ्वी नजीकच्या कक्षेत भ्रमण करत विविध वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. यामध्ये मुंबईस्थित के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा हौशी रेडिओ उपग्रह ‘बिलीफसॅट-0’चा सहभाग आहे. ‘इस्रो’च्या विक्रम साराभाई स्पेससेंटरमधील फ्युएल सेल पॉवर सिस्टम आणि सिलिकॉन-आधारित ‘हाय एनर्जी सेल’ हे दोन पेलोड, तसेच अहमदाबादस्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळेत ग्रहांवरील धूलिकणांची संख्या मोजण्यासाठी डिझाइन केलेले ‘डस्ट एक्सपेरिमेंट’देखील या मोहिमेचा भाग आहेत. (Launch of small satellites)
तिरुअनंतपुरम स्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने विकसित केलेला एक उपग्रहदेखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला. सौर विकिरण आणि अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे असा या उपग्रहाचा उद्देश्य आहे. (Satellite of Women Engineers)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.