Chandrayaan-3 Curtain Raiser : इतिहास रचण्यासाठी उरले काही तास; इस्रोने शेअर केला चांद्रयान-३ मोहिमेचा कर्टन रेजर व्हिडिओ

आज दुपारी २.३५ वाजता चांद्रयान-३ अंतराळात झेप घेईल.
Chandrayaan-3
Chandrayaan-3eSakal
Updated on

ISRO Chandrayaan-3 Update : चांद्रयान-३ लाँच होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. आज दुपारी २.३५ वाजता श्रीहरीकोटामधील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन हे चांद्रयान अवकाशात झेप घेईल. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर इस्रोने या मोहिमेचा कर्टन रेजर व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये इस्रोने आपल्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून ही मोहीम कशा प्रकारे पार पडेल हे दाखवलं आहे. यासोबतच, इस्रोच्या लॅबमधील मोहिमेच्या तयारीचे काही क्षण यात दाखवले आहेत.

ऑगस्टमध्ये होणार लँडिंग

चांद्रयान-३ मोहिमेचं कोडनेम LVM3 M4 असं आहे. आज लाँच झाल्यानंतर चांद्रयानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागेल. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होईल. चंद्राच्या या भागात उतरणारा भारत पहिलाच देश ठरणार आहे. (ISRO Chandrayaan-3 Mission)

Chandrayaan-3
ISRO Moon Mission : चांद्रयान-२ पासून धडा घेत केल्या चांद्रयान-३ मध्ये सुधारणा; 'या' गोष्टींमुळे यशस्वी होणार यंदाची मोहीम

चांद्रयान-२ च्या चुकांमधून धडा

यापूर्वी चांद्रयान-२ मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न भारताने केला होता. मात्र लँडिंगवेळी झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे विक्रम लँडर क्रॅश झालं. या मोहिमेतून धडा घेत, चांद्रयान-३ मध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी ही मोहीम यशस्वी होणारच असा विश्वास इस्रोच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.