ISRO Scientist Salary : इस्रोच्या वैज्ञानिकांना किती पगार मिळतो माहितीये? सुविधा आणि बरच काही जाणून घ्या

चंद्र मोहिम कायमच सर्वच खगोलप्रेमींसाठी मोठे आकर्षण असते. सध्या चांद्रयान ३ ही मोठी घटना घडली.
ISRO Scientist Salary
ISRO Scientist Salaryesakal
Updated on

ISRO Scientist Salary, Facilities In Marathi :

चंद्र मोहिम कायमच सर्वच खगोलप्रेमींसाठी मोठे आकर्षण असते. सध्या चांद्रयान ३ ही मोठी घटना घडली. चांद्रयान ३ चंद्राच्या दिशेने नुकतेच झेपावले आहे. इस्रोने केलेले हे लाँचिंग यशस्वी झाले आहे. त्यामुळे सगळ्यांनाच इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक वाटतं.

पण तुम्हाला आपल्या देशाच्या या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनविषयी, तिथे काम करण्यासंदर्भात कितपत माहिती आहे? जाणून घेऊया.

इस्रोमध्ये वैज्ञानिकांचे वेगवेगळे पद आहेत, त्यांनुसार त्यांना मिळणारे वेतन आणि फायदे, सुविधा वेगवेगळ्या असतात. याचा लाभ कर्मचाऱ्याला प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला इस्रोमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर पुढील गोष्टी आधी जाणून घेणं आवश्यक आहे.

इस्रोतील पदे - वैज्ञानिक

रिन्यूमरेशन - ५६,१०० रुपये प्रति महिना

नोकरीचे ठिकाण - बंगळुरू

ISRO Scientist Salary
ISRO: भारताच्या 5 अवकाश मोहिमा, ज्यात आहे जग बदलण्याची ताकद

इस्रो वैज्ञानिकांना मिळणाऱ्या सुविधा

  • घर भाडे भत्ता

  • महागाई भत्ता

  • वैद्यकीय भत्ता

  • वाहतूक भत्ता

  • विमा

  • नवीन पेन्शन योजना

  • प्रवास सवलत

  • गट विमा

  • हाऊस बिल्डिंग अॅडव्हांस

ISRO Scientist Salary
ISRO : अशी झाली होती इस्रोची स्थापना

इस्रोमध्ये करिअरची संधी

  • जॉब प्रोफाइलनुसार नेमून दिलेले काम करणे अपेक्षित असतेच.

  • यात उपग्रह प्रक्षेपण, ग्रह निरीक्षणासह त्याचे अनेक प्रकल्प, मोहिमांसाठी संशोधन, विकास, अंमलबजावणी व्यवस्थित करण्यासाठी वैज्ञानिक शाखांमध्ये शास्त्रज्ञ आणि अभियंतांची नियुक्ती केली जाते.

  • या कर्मचाऱ्यांना करिअरमध्ये स्थिरता आणि नोकरीची सुरक्षा मिळते.

  • प्रोबेशन कालावधी पुर्ण केल्यावर अतिरीक्त सुविधांचा लाभ मिळतो.

  • कामाच्या गुणवत्तेवर प्रमोशन मिळते. हे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभवावर अवलंबून असते.

  • यांना नियमित प्रशिक्षणेही दिले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.