Chandrayaan 3 Video : विक्रम लँडरमधून कसा दिसतोय चंद्र? 'चांद्रयान-3'ने पाठवला खास व्हिडिओ, पाहा

ISRO Moon Mission : प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर आता विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास करत आहे.
Chandrayaan 3 Video
Chandrayaan 3 VideoeSakal
Updated on

चांद्रयान-3 ने एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. चांद्रयानातील प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल काल (17 ऑगस्ट) एकमेकांपासून वेगळे झाले होते. आता विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास करत आहे. यातच लँडरवरील कॅमेऱ्याने चंद्राची काही दृष्ये टिपली आहेत.

इस्रोने आपल्या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर लगेच लँडर इमेजरने हा व्हिडिओ कॅप्चर केला. सुमारे 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये चंद्राचा दक्षिण ध्रुवाजवळील भाग दिसत आहे.

Chandrayaan 3 Video
Chandrayaan 3 : ‘चांद्रयान-३’ चंद्राच्या उंबरठ्यावर! चंद्राच्या दक्षिण गोलार्धात २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता उतरविणार

यासोबतच लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने देखील चंद्राचा आणखी एक व्हिडिओ घेतला आहे. 15 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. इस्रोने आज हे दोन्ही व्हिडिओ शेअर केले आहेत.

कसा असणार लँडरचा पुढचा प्रवास?

प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर आता लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करणार आहे. यासाठी दोन वेळा डी-बूस्टिंग प्रक्रिया राबवण्यात येईल. लँडर मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोन गोष्टींचा समावेश आहे. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.

Chandrayaan 3 Video
Luna 25 : अखेर चंद्राची लपलेली बाजू आली समोर; रशियाच्या 'लूना 25'ने पाठवला पहिला फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.