ISRO GSLV-F14 Mission : भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. इस्रोच्या नॉटी बॉय रॉकेटच्या मदतीने INSAT-3DS या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हा भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह आहे. यामुळे हवामानाची आणि नैसर्गिक संकटांची अचूक माहिती मिळू शकणार आहे.
प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे 15 मिनिटांमध्ये इनसॅट-3DS हा उपग्रह आपल्या नियोजित कक्षेत पोहोचवण्यात आला. ज्याप्रमाणे अपेक्षा होती, त्याप्रमाणेच ही मोहीम पार पडली, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली. यावेळी त्यांनी या मोहिमेत सहभागी असणाऱ्या इस्रोच्या सर्व संशोधकांचं अभिनंदन देखील केलं.
इनसॅट-3 सीरीजमध्ये आधीपासून सहा वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आहेत. आता यामध्ये हा सातवा उपग्रह जोडला गेला आहे. या उपग्रहामध्ये इमेजर पेलोड, साऊंडर पेलोड, डेला रिले ट्रान्सपाँडर आणि सॅटेलाईट अँड रिसर्च रेस्क्यू ट्रान्सपाँडर असे पेलोड देण्यात आले आहेत. या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी सिग्नल सिस्टीम या गोष्टींची माहिती देणे हा आहे. यासोबतच मदत आणि बचावकार्यातही याचं सहकार्य होणार आहे. या मोहिमेचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं केला आहे.
या मोहिमेसाठी इस्रोने 'नॉटी बॉय' या रॉकेटचा वापर केला होता. GSLV रॉकेटचे हे 16 वे उड्डाण होते. तसंच स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजचे हे 10 वे उड्डाण होते. हे उड्डाण अगदी यशस्वीपणे पार पडल्यामुळे आता 'नॉटी बॉय' हा नॉटी राहिला नाही. तो अगदीच मच्युअर आणि डिसिप्लिन्ड बॉय झाल्याचं मत मिशन डायरेक्टर टॉमी जोसेफ यांनी व्यक्त केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.