ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जुलैच्या सुमारात त्यांच्या नवीन 'स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल' (एसएसएलव्ही) ची तिसरी आणि अंतिम विकासात्मक उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे. हे उड्डाण जुलै 10, 2024 च्या आसपास होण्याची शक्यता आहे. या यशस्वी उड्डाणानंतर, भारताची लघु उपग्रह प्रक्षेपनाच्या क्षेत्रात आघाडीची मोठी झेप असणार आहे. या उड्डाणानंतर SSLV पूर्णपणे कार्यान्वित रॉकेट म्हणून काम करायला सुरुवात करेल.
SSLV हे अतिलहान आणि सूक्ष्म उपग्रह अतिशय कमी खर्चात अंतराळात पाठवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत दोन वेळा उड्डाण घेतलेल्या या रॉकेटच्या तिसऱ्या उड्डाणानंतर ते पूर्णतः कार्यक्षम होईल आणि जगातील सर्वात स्वस्तात्मक प्रक्षेपणाच्या बाबतीत भारताची बढती होईल.
हे रॉकेट 500 किलो वजनाचे उपग्रह 500 किलोमीटर खाली असलेल्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये किंवा 300 किलो वजनाचे उपग्रह 500 किलोमीटर पेक्षा जास्त उंच असलेल्या सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये पाठवू शकते. ही संपूर्ण प्रणाली अगदी 72 तासांच्या आत तयारी होऊ शकते. विशेष म्हणजे, SSLV ची लांबी 34 मीटर, व्यास 2 मीटर आणि वजन 120 टन आहे.
आतापर्यंत लहान उपग्रह अंतराळात पाठवायचे असल्यास PSLV ची वाट पाहावी लागत होती. त्या तुलनेत SSLV पाच ते सहा पटींनी स्वस्त आहे. त्यामुळे आता लहान उपग्रह प्रक्षेपनासाठी स्वस्त आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. एसएसएलव्ही अवघ्या ७२ तासांत तयार होते. सध्या, SSLV श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या लॉन्च पॅड 1 वरून प्रक्षेपित केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात लघु उपग्रह मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांच्या प्रक्षेपनाची मागणी वाढत आहे. या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आघाडी घेण्यासाठी इस्रोने हे SSLV रॉकेट विकसित केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.