ISRO's ambitious plans for lunar exploration and human spaceflight:
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी गगनयान मोहिमेबाबत मोठी घोषणा केली आहे. इस्रो प्रमुख म्हणाले की, भारत 2026 मध्ये गगनयान मिशन अवकाशात पाठवेल. तर चांद्रयान-4, 2028 मध्ये प्रक्षेपित केले जाईल. भारत आणि अमेरिकेचा संयुक्त प्रकल्प मिशन NISAR पुढील वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
इस्रोचे अध्यक्ष म्हणाले की, जपानसोबतच्या संयुक्त उपक्रमांतर्गत LUPEX मिशन म्हणजेच चंद्र ध्रुवीय शोध प्रकल्प चांद्रयान-5 मिशन असेल.