ISRO RLV Pushpak : इस्रोच्या 'पुष्पक'ची तयारी अंतिम टप्प्यात;यशस्वी लँडिंगसाठी किती दिवस बाकी,जाणून घ्या

RLV Pushpak : कर्नाटकाच्या हवाई चाचणी केंद्रातुन होणार चाचणी;हवामानामुळे होऊ शकतो परिणाम
Third Test for ISRO's RLV Pushpak on Hold Due to Weather
Third Test for ISRO's RLV Pushpak on Hold Due to Weatheresakal
Updated on

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुष्पक या पुनर्वापर करता येणार्‍या प्रक्षेपण यानाच्या तिसऱ्या लँडिंग चाचणीसाठी सज्ज झाली आहे. पुष्पक यान आणि चिनूक हेलिकॉप्टरसह सर्व यंत्रणा तयारी आहेत. मात्र, हवामानामुळे ही चाचणी येत्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

कर्नाटकाच्या चित्तलदुर्ग येथील हवाई चाचणी केंद्रात RLV-LEX3 ही लँडिंग चाचणी केली जाणार आहे. यापूर्वी मार्च 22 रोजी झालेल्या RLV-LEX2 चाचणीदरम्यान पुष्पक यान यशस्वीरित्या स्वायत्त लँडिंग करण्यात यशस्वी ठरले होते.

आगामी RLV-LEX3 ही चाचणी अधिक आव्हानात्मक असणार आहे. या चाचणीदरम्यान यानाला सुमारे 500 मीटर दिशेने सोडण्यात येईल. LEX2 चाचणीदरम्यान ही चूक फक्त 150 मीटर होती. या चुकीच्या दिशेतून पुष्पक यानाला स्वतःला मार्गावर आणून, आवश्यक दिशा सुधारणा करून निर्धारित ठिकाणी उतरावे लागणार आहे.

Third Test for ISRO's RLV Pushpak on Hold Due to Weather
Magic Eraser Tool : आता चुटकीसरशी गायब होणार फोटोतील नकोसा भाग;वापरून पाहा 'हे' नवीन AI टूल

इस्रोच्या सूत्रांनुसार ही चाचणी अत्यंत महत्वाची आहे. या चाचणीदरम्यान एक नवीन मार्गदर्शन प्रणाली वापरण्यात येणार आहे. ही प्रणाली एकाच वेळी उभ्या आणि आडव्या अक्षांवर होणारी चूक सुधारू शकते. यामुळे LEX2 चाचणीपेक्षा अधिक नियंत्रित लँडिंग शक्य होईल.

या चाचणीदरम्यान उतरण्याचा वेग कमी करण्यासाठी मुख्य लँडिंग गियरची रेंज कमी करण्यात आली आहे. LEX2 चाचणीदरम्यान ही रेंज प्रति सेकंदाला 1.5 मीटर इतकी होती, तर आता ती 1 मीटर प्रति सेकंदाला करण्यात आली आहे. याशिवाय, उतरण्याचा मार्ग आणि वेग माहितीसाठी मार्कर वापरण्यात येणार आहे. यामुळे भविष्यातील चाचण्या आणि सुधारणांसाठी आवश्यक माहिती मिळेल.

Third Test for ISRO's RLV Pushpak on Hold Due to Weather
Father's Day 2024 : फादर्स डे निमित्त वडिलांना द्या 'हे' खास गिफ्ट; सतत करून देत राहील तुमची आठवण

पुष्पक या पुनर्वापर करता येणार्‍या यानाच्या यशस्वी लँडिंगमुळे अंतराळ मोहिमा अधिक किफायतशीर आणि टिकाऊ बनतील, अशी अपेक्षा आहे. या चाचण्यांचे यश ही इस्रोच्या महत्वाकांक्षी पुनर्वापर करता येणारी प्रक्षेपण याने आणि मानव अंतराळ प्रवास या कार्यक्रमांसाठी निर्णायक पावले ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.