ISRO RLV : इस्रोने पुन्हा केली कमाल! पुष्पकची तिसरी यशस्वी लँडिग करून रचला इतिहास; पाहा व्हिडिओ

ISRO Pushpak Test : भविष्यात अंतराळातून परतीच्या मोहिमांसाठी उपयुक्त अत्याधुनिक मार्गदर्शन प्रणालीचाही वापर
ISRO Achieves Third Success in RLV Landing Experiment of Pushpak
ISRO Achieves Third Success in RLV Landing Experiment of Pushpak esakal
Updated on

ISRO : इस्रोच्या पुष्पक यानाचे अवतरण प्रयोग हवामानाच्या बदलामुळे रखडलेले होते. इस्रोने पुनर्वापर करता येणार्‍या प्रक्षेपण यानाच्या (RLV) अवतरणाच्या क्षेत्रातील तिसरा यशस्वी प्रयोग आज रविवारी केला. यावेळी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत स्वायत्त अवतरण (Autonomous Quotation) क्षमता पुष्पक यानाने दाखवून दिली.

ही चाचणी अंतराळातून परत येणार्‍या यानाच्या अवतरणासाठीच्या प्रक्रियेचे अनुकरण करते. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाने पुनर्वापर करता येणारे प्रक्षेपणयान (RLV) विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञानात इस्रोची आघाडी आणि विशेषज्ञता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

कर्नाटकातल्या चित्रदुर्ग येथील वैमानिक परीक्षण क्षेत्रात (ATR) आज सकाळी 7:10 वाजता ही चाचणी (LEX-03) पार पडली. यापूर्वी झालेल्या LEX-01 आणि LEX-02 चाचण्यांच्या यशानंतर आणखी आव्हानात्मक परिस्थिती (500 मीटरची बाजूकळ अंतर - LEX-02 पेक्षा जास्त) आणि तीव्र वारा असतानाही पुष्पक यानाने स्वायत्तपणे अवतरण केले, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

ISRO Achieves Third Success in RLV Landing Experiment of Pushpak
Flipkart Minutes : 15 मिनिटात वस्तू तुमच्या हातात; झेप्टो, ब्लिंकिटशी स्पर्धा करण्यासाठी फ्लिपकार्टची 'Minutes' सेवा होतीये लाँच

वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे 4.5 किलोमीटर उंचीवरून आकाशात सोडण्यात आलेल्या या पंख असलेल्या पुष्पक यानाने स्वायत्तपणे दिशा सुधारली आणि धावपट्टीवर अचूक असे क्षैतिज अवतरण केले. या विमानाच्या आकारामुळे अवतरणाचा वेग ताशी 320 पेक्षा जास्त होता. एखाद्या व्यापारी विमानापेक्षा (ताशी 260) आणि लढाऊ विमानापेक्षा (ताशी 280)ही जास्त होता, असे इसरोने नमूद केले.

अवतरणानंतर जमिनीवर येताना ब्रेक शेड वापरून यानाचा वेग ताशी 100 पर्यंत कमी करण्यात आला. त्यानंतर लँडिंग गियरच्या ब्रेकचा वापर करून विमान पूर्णपणे थांबवण्यात आले. यावेळी पुष्पक यानाने आपोआप आपले संतुलन राखून धावपट्टीवर सरळ रेषेत धाव घेतली.

ही चाचणी अंतराळातून परत येणार्‍या यानाच्या अवतरणाच्या प्रक्रियेचे अनुकरण करते. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाने पुनर्वापर करता येणारे प्रक्षेपणयान (RLV) विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञानात इस्रोची आघाडी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

ISRO Achieves Third Success in RLV Landing Experiment of Pushpak
Sugarcane Production : ‘एआय’द्वारे ऊस उत्पादनवाढीचा प्रयोग ठरला यशस्वी; 'या' हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ,जाणून घ्या

या चाचण्यांद्वारे भविष्यातील अंतराळातून परतीच्या मोहिमांसाठी उपयुक्त अत्याधुनिक मार्गदर्शन प्रणालीही यशस्वीरीत्या वापरली गेली आहे.

पुष्पक यानाच्या या यशस्वी प्रयोगासाठी विक्रम साराभाई अंतराळ केंद्रासह (VSSC) अनेक इसरो केंद्रांनी (SAC, ISTRAC, SDSC) समन्वयाने काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()