Sangli ITI : ‘आयटीआय’ विद्यार्थ्यांनी बनविली खतरनाक तोफ! एका हातात उचलेल एवढी लहान,भेदणार १०० फुटांपर्यंतचे लक्ष्य

ITI Students Invension : सांगली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांनी एका हातात उचलून नेता येईल, इतकी छोटी तोफ बनविली आहे.
Sangli
Sangli esakal
Updated on

Sangli : सांगली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांनी एका हातात उचलून नेता येईल, इतकी छोटी तोफ बनविली आहे. पण, ती साधीसुधी नाही बरं का, ही तोफ १०० फूट अंतरावरचे लक्ष्‍यभेद करू शकते.

Sangli
Smartphone Tips: चार्जिंग करताना मोबाईल जास्त गरम होतोय? वेळीच सावध व्हा अन् फोनला करा..

अभ्यासक्रमात नवनिर्मितीसाठी काहीतरी वेगळे डिझाईन निवडावे म्हणून त्यांनी तोफ निवडली आणि विशेष म्हणजे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी ती डागून उद्‍घाटनदेखील केले.

पूर्वी लाकूड किंवा पंचधातूपासून तोफ बनवली जात होती. तेच शास्त्र वापरून या मुलांनी तोफेचे डिझाईन केले. काही तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी यू-ट्युबची मदत घेतली. अनेक बारकावे समजून घेतले. दारूगोळा मिळविला.

Sangli
Youtube Viral : तुमचे युट्युब व्हिडिओ व्हायरल होत नाहीयेत? फक्त 'हे' सोपे बदल तुम्हाला मिळवून देतील लाखो व्ह्युज अन् फॉलोअर्स

अखेर, छोटी तोफ तयार झाली. या तोफेची लांबी आहे एक फूट आणि रुंदी ८ इंच. ती हातातून नेता येते. त्यातील छोटा गोळा ८० ते १०० फुटांपर्यंत जातो.

या विद्यार्थ्यांचा समावेश!

अनिकेत ढेरे, इसाक सनदी, यल्लाप्पा हुलकट्टी, हर्षवर्धन पाटील, राज जाधव, मुल्ला मोदी बाशू, सूरज जाधव, राहुल सूर्यवंशी, तेजस सूर्यवंशी, आदिनाथ पवार या विद्यार्थ्यांनी ही तोफ बनविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.