Range Rover in India : ‘रेंज रोव्हर’ची निर्मिती देशात सुरू

TATA Motors : सध्या पुण्यात जग्वार लँड रोव्हरच्या प्रकल्प
Range Rover Production Begins in India JLRs Historic Move
Range Rover Production Begins in India JLRs Historic Moveesakal
Updated on

Range Rover : टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरने (जेएलआर) रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट्‌स या वाहनांचे उत्पादन भारतात सुरू केले आहे. जग्वार लँड रोव्हर कंपनीची १९७० मध्ये स्थापना झाल्यापासून ५४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या मोटारींचे इंग्लंडबाहेर उत्पादन होणार आहे. आतापर्यंत या मोटारींचे उत्पादन फक्त इंग्लंडमधील सोलिहुल प्रकल्पात केले जात होते.

या मोटारी भारतासह जगभरातील सुमारे १२१ देशांमध्ये निर्यात केल्या जातात. आता भारतातच जग्वार लँड रोव्हरच्या मोटारींची निर्मिती होणार असल्याने त्यांच्या किमती सुमारे १८ ते २२ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या विक्रीत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Range Rover Production Begins in India JLRs Historic Move
Safest cars of India: 'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित 7 गाड्या; जाणून घ्या

जेएलआरने गेल्या आर्थिक वर्षात देशात ४,४३६ वाहनांची विक्री केली असून, विक्रीत ८१ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. विक्रीतील या जोरदार वाढीमुळे कंपनीने भारतात आणखी दोन मोटारी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पुण्यातील जग्वार लँड रोव्हरच्या प्रकल्पात रेंज रोव्हर वेलार, इव्होक, जग्वार एफ-पेस आणि डिस्कव्हरी स्पोर्ट या मोटारींची निर्मिती केली जाते. या मोटारींचे सुटे भाग (नॉक्ड डाउन) आयात करून इथल्या प्रकल्पात त्याची जुळणी करून मोटारी तयार करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.

Range Rover Production Begins in India JLRs Historic Move
Scientist Shrinivas Kulkarni : कोल्हापूरच्या शास्त्रज्ञाला मिळणार खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्कार!

टाटा समूहाने २००८ मध्ये दिवाळखोरीत निघालेल्या फोर्ड कंपनीचा जग्वार-लँड रोव्हर (जेएलआर) हा लक्झरी ब्रँड ९३०० कोटी रुपयांना विकत घेतला. या कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच महसुलात ११ टक्के वाढ नोंदवली असून, ८३ हजार कोटी रुपयांचा उच्चांकी महसूल मिळवला आहे, तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसुलात २७ टक्के वाढ होऊन तो तीन लाख कोटी रुपये झाला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांकी महसूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.