जपानने गुरुवारी (7 सप्टेंबर) आपली चांद्र मोहीम लाँच केली. जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA ने चंद्राच्या दिशेने एक लँडर आणि एक्स-रे टेलिस्कोप पाठवला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्रावर उतरणारा जपान पाचवा देश ठरेल.
आपल्या H-2A रॉकेटच्या मदतीने जपानने XRISM हा सॅटेलाईट आणि SLIM हा लँडर लाँच केले. हे लाँचिंग यशस्वी झाले असून, आता या दोन्ही गोष्टी चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. इंधनाची बचत करण्यासाठी एवढा जास्त वेळ घेऊन जपान चंद्रावर पोहोचेल.
जपानच्या चांद्र मोहिमेचं बजेट साधारणपणे 831 कोटी रुपये एवढं आहे. यापूर्वी देखील जपानने चंद्रावर उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर ही 'मून स्नायपर' मोहीम आखण्यात आली. या रॉकेटचं लाँचिंग देखील गेल्या बऱ्याच काळापासून वारंवार पुढे ढकललं जात होतं.
जपान या मोहिमेद्वारे एक छोटं लँडर चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी जपानने चंद्रावर अगदी लहान जागा निश्चित केली आहे. केवळ 100 वर्ग मीटर जागेमध्ये जपान अचूकपणे आपलं लँडर उतरवेल. यामुळेच या मोहिमेला 'मून स्नायपर' असं नाव दिलं आहे.
जपानच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख हिरोशी यामाकावा यांनी दिलेल्या माहितीनुसार; केवळ सॉफ्ट लँडिंग नाही, तर ठरलेल्या जागेतच लँडिंग करण्याचं जपानचं लक्ष्य आहे. SLIM लँडर हे चंद्रावर मेयर नेक्टारिस (Mare Nectaris) या जागेत उतरवण्यात येणार आहे. या जागेला चंद्राचा समुद्र असंही म्हटलं जातं.
जपानचं लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या ऑलिव्हिन दगडांचा अभ्यास करेल. यामुळे चंद्राची उत्पत्ती कशी झाली याबाबत माहिती मिळणार आहे. सोबतच, XRISM सॅटेलाईट हे चंद्राभोवती फिरुन, चंद्रावर वाहणाऱ्या प्लाझ्मा हवेचा अभ्यास करेल. यामुळे ताऱ्यांची आणि आकाशगंगांची उत्पत्ती कशा प्रकारे होते याचा शोध लावता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.