अॅडव्हेंचर कारच्या ग्राहकांची प्रतिक्षा संपली. जीप इंडियाने (Jeep India) आपली लोकप्रिय ऑफ रोड एसयूव्ही जीप कंपासचे नवीन व्हेरिएंट Jeep Compass Trailhawk 2022 लाँच केले आहे. कंपनीने या लाँच पूर्वी या एसयूव्हीचे टिझर लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने २७ फेब्रुवारीला भारतीय बाजारात (Indian Market) सादर केले आहे. जीप कम्पास ट्रेलहकच्या किंमतींविषयी बोलाल तर तिची ३०.७२ लाख ही सुरुवाती किंमत (एक्स शोरुम) आहे. तर या कारचे फिचर्स जाणून घेऊ या... (Jeep Compass Trailhawk 2022 Launched In India)
या कारचे इंजिन म्हणाल तर कंपनीने त्यात २.० लीटर मल्टिजेट टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन १७० बीएचपीचे पाॅवर आणि ३५० एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबरच ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबाॅक्स दिले गेले आहे. कारमध्ये काही सौंदर्यात्मक बदलांबरोबरच इतर फिचर्स अपडेट केले गेले आहे. त्यात १०.२५ इंचाचे फुल डिजिटल इंन्स्ट्रमेंट क्लस्टर दिले गेले आहे. त्याबरोबरच अँड्राॅईड ऑटो आणि अॅपल कार प्लेची कनेक्टिव्हिटी असणारा १०.२५ इंचाचे फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले गेले आहे. या व्यतिरिक्त कार कनेक्टेड टेक्नाॅलाॅजी, पॅनोरॅमिक सनरुफ, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, ३६० डिग्री कार पार्किंग आदी फिचर्स दिले गेले आहे.
कारमध्ये स्लीक एलईडी हेडलँप आणि फ्रंट स्लेटेड ग्रिलमध्ये काही बदल केले. त्यामुळे कार आणखीन आकर्षक बनते. तसेच कंपनीने तिच्या बोनटवर अँटी ग्लेअर ग्राफिक्स दिले आहे. त्यामुळे ही कार आकर्षक बनते. भारतात लाँच झाल्यानंतर या कारचा सामना एमजी हेक्टर, ह्युंदाई टक्सन, टाटा हॅरिअर, फोक्सवॅगन टायगून, फोर्ड एंडेव्हर आदींशी असेल. जर तुम्हाला ही कार खरेदी करायचे असेल तर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बुक करु शकता किंवा आपल्या जवळच्या डिलरकडे जाऊन ऑफलईन बुक करु शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.