Jeep Meridian Upland And Meridian X Price : इंडीयन मार्केटमध्ये फुल साइज एसयूव्ही सेगमेंट मध्ये टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लॉस्टरसह अन्य जबरदस्त एसयूव्हीला टक्कर देत असलेली जीप मेरिडियनचे दोन नवीन स्पेशल एडिशन लाँच करण्यात आले आहेत.
जीप इंडियाची थ्रो रो एसयूव्ही मेरिडियनला जबरदस्त स्टाइल आणि एडवेंचर सोबत सॉफिस्टिकेशन सोबत आणले गेले आहे. या नावचे नाव जीप मेरिडियन एक्स आणि जीप मेरिडियन अपलँड असे आहे. या ऑफरोडसाठी एक खास लाइफस्टाइलची झलक पाहायला मिळत आहे.
जीप मेरिडियनची किंमत
जीप मेरिडियनच्या स्पेशल एडिशनची बुकिंग आता जीप डीलरशीप आणि जीप इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू करण्यात आली आहे. याची एक्स शोरूम किंमत ३२.९५ लाख रुपयांपासून सुरू होते.
जीप मेरिडियन स्पेशल एडिशनची डिलिव्हरी एप्रिल २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू केली जाणार आहे. जीप मेरिडियनला दोन नवीन कलर सिल्वर मून आणि गॅलेक्सी ब्लू मध्ये आणले गेले आहे. जीप मेरिडियन स्पेशल एडिशन अनेक बेस्ट क्लास फीचर्स सोबत 4x4 ड्राइवट्रेन चे कॉम्बो आहे.
मॉडेलचे फीचर्स
अर्बन फोकस्ड जीप मेरिडियन एक्सला त्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. ज्यांना भव्य दिव्य पाहायचे असते. मेरिडियन एक्स मध्ये स्टायलिश बॉडी कलर लोअर, ग्रे रूफ आणि ग्रे पॉकेट सोबत अलॉय व्हील पाहायला मिळते. याशिवाय, यात साइड मोल्डिंग, पेडल लँम्प्स सारखे बाहेरचे मॉडिफिकेशन आणि एम्बियंट लायटिंग सारखे इंटिरियर मॉडिफिकेशन पाहायला मिळते.
तर एडवेंचर ओरिएंटेड जीप मेरिडियन अपलँड अशा लोकांसाठी खास आहे. ज्यांना काहीही करायला आवडते. यात स्प्लॅश गार्ड्स, बूट ऑर्गनायजर, प्रीमियम फुटस्टेप्स, सनशेड्स, स्पेशल केबिन, कार्गो मॅट्स आणि टायर इंफ्लेटर शिवाय, हुड डेकल आणि रूफ कॅरियर सारखे बाहेरिल मॉडिफिकेशनचा समावेश आहे.
जीप मेरिडियन एसयूव्ही पॉवर आणि फीचर्स सोबत स्पीडमध्ये सुद्धा जबरदस्त आहे. ही केवळ १०.८ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रति तासचा वेग पकडते. याची टॉप स्पीड १९८ किमी प्रति तास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.