Jio Recharge : जिओ वर्धापनदिन स्पेशल ऑफर! खास रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय फ्री डेटा अन् 11 OTT प्लॅटफॉर्म, Zomato गोल्ड...

jio 8th anniversary special recharge plans : Jio त्यांच्या 8व्या वर्धापनानिमित्त एक खास ऑफर घेऊन आलेले आहे. ही 5 दिवसांची मर्यादित ऑफर आहे.
jio 8th anniversary special recharge plans
jio 8th anniversary special recharge plansesakal
Updated on

Jio Anniversary Recharge Offers : Jio त्यांच्या 8व्या वर्धापनानिमित्त एक खास ऑफर घेऊन आलेले आहे. ही 5 दिवसांची मर्यादित ऑफर आहे, ज्यामध्ये तुम्हाला तब्बल 700 रुपयांचा फायदा होणार आहे.

Jio ने त्यांच्या निवडक रिचार्ज प्लॅन्सवर खास ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान रिचार्ज करा आणि 3 धमाकेदार फायदे मिळवू शकता.

या खास ऑफरचा लाभ फक्त ₹899 आणि ₹999 च्या तिमाही रिचार्ज प्लॅन्स आणि ₹3599 च्या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर मिळणार आहे.

जिओ कंपनीने जुलै महिन्याच्या सुरुवातीला रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवल्यानंतर ग्राहक वर्गात प्रचंड नाराजी होती. पण जिओची ही खास ऑफर जिओ वापरकर्त्यांना खुश करणारी आहे.

jio 8th anniversary special recharge plans
BSNL 5G : ठरलं तर मग! या तारखेला लाँच होणार BSNL 5G; पटकन चेक करा तुमच्या एरियामध्ये नेटवर्क आहे काय?

Jio ची वर्धापन दिन ऑफर काय आहे?

निवडलेल्या प्लॅन्सवर रिचार्ज केल्यावर तुम्हाला ₹700 रुपयांचा फायदा मिळतो. यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 10 OTT सबस्क्रिप्शन आणि 10 GB डेटा पॅक (दर ₹175) समाविष्ट आहे.

याशिवाय, तुम्हाला 3 महिन्यांची मोफत Zomato गोल्ड सदस्यता आणि ₹2999 पेक्षा जास्त खरेदीवर ₹500 ची AJIO कूपन देखील मिळेल.

jio 8th anniversary special recharge plans
Airtel Family Recharge : आता मजाच मजा! Airtel फॅमिली रिचार्ज फक्त 1000 रुपयांत; एका प्लॅनमध्ये चार कनेक्शन,डेटा-कॉलिंग,OTT आणि...

Jio रिचार्ज प्लॅन्स

₹899 रिचार्ज प्लॅन: 90 दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS. यामध्ये दररोज 2GB डेटा, अतिरिक्त 20GB डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा समाविष्ट आहे.

₹999 रिचार्ज प्लॅन - 98 दिवसांची वैधता, दररोज 2GB डाटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS.

₹3599 रिचार्ज प्लॅन: 365 दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS. यामध्ये दररोज 2.5GB डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा समाविष्ट आहे.

Jio ची ही सुवर्णसंधी सोडू नका आणि आताच तुमचा रिचार्ज करून तत्काळ ऑफरचा लाभ घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.