देशातील टॉपच्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत. Airtel आणि Vodafone-Idea प्रीपेड प्लॅनच्या नवीन किमती गेल्या आठवड्यापासून लागू झाल्या आहेत. त्याच वेळी, 1 डिसेंबरपासून जिओचे प्रीपेड प्लॅन देखील महाग होणार आहेत. अशा परिस्थितीत, आता तुम्हाला कमी किमतीत बेस्ट प्लॅन निवडण्यात काही अडचण येऊ शकते. आज आपण 400 रुपयांपेक्षा कमीत मिळणारे काही बेस्ट Jio, Airtel आणि Vi चे प्लॅन्स पाहाणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि फ्री कॉलिंग तसेच अनेक इतर फायदे देखील मिळतील. चला सविस्तर जाणून घेऊया.
एअरटेलचा 400 रुपयांपेक्षा कमीत मिळणारे प्लॅन
179 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनी 2 GB डेटा आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Video च्या मोबाइल व्हर्जनचे फ्री ट्रायल देखील मिळेल.
265 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा तसेच देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे. दररोज 100 मोफत एसएमएस ऑफर करणार्या या प्लॅनमध्ये, तुम्हाला Amazon Prime Video च्या व्हर्जनचे फ्री ट्रायल देखील मिळेल.
299 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता देखील 28 दिवस आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस दिले जात आहेत. अमर्यादित कॉलिंग सह येणाऱ्या या प्लॅनमध्ये कंपनी Amazon Prime Video च्या मोबाइल व्हर्जनचे फ्री ट्रायल देखील देत आहे.
359 रुपयांचा प्लॅन
या प्लॅन मध्ये कंपनी 28 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएस आणि अमर्यादित फ्री कॉलिंग सुविधा देखील मिळेल. हा प्लॅन Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनचा फ्री एक्सेस देतो.
400 रुपयांपेक्षा कमीत व्होडाफोनचे बेस्ट प्लॅन्स
400 रुपयांखालील व्होडाफोन आणि एअरटेल प्लॅन जवळपास सारखेच आहेत. 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये Vodafone आपल्या यूजर्सना 28 दिवसांची वैधता आणि 2 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध असेल.
269 रुपयांचा प्लॅन
दररोज 1 GB डेटा ऑफर करणारा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएससह अमर्यादित कॉलिंगचा लाभही मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी Vi Movies आणि TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.
299 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 1.5 GB डेटा मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेसह येणारा, हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 फ्री एसएमएस देखील ऑफर करतो. प्लॅनमध्ये देण्यात येणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night आणि Vi Movies & TV अॅपची मोफत सबस्क्रिप्शन देखील आहे.
359 रुपयांचा प्लॅन
या प्लॅन मध्ये कंपनी दररोज 2 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस दिले जात आहेत. ही योजना वापरकर्त्यांना Binge All Night सोबत Vi Movies & TV अॅपचे फ्री सबस्क्रिप्शन देखील देते.
Jio प्लॅन्स जे 400 रुपयांपेक्षा कमीत मिळतात
Jio चा 129 रुपयांचा प्लॅन 1 डिसेंबरपासून 155 रुपयांचा असेल. या प्लॅनमध्ये 2 GB डेटा, अमर्यादित कॉलिंगसह 300 फ्री एसएमएस मिळतील. त्याच वेळी, Jio च्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1 GB डेटा आणि फ्री कॉलिंग मिळते. कंपनीच्या या प्लॅनची किंमत आधी 149 रुपये होती.
239 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध असेल, जे दररोज 100 फ्री एसएमएससह येते. कंपनीच्या साइटवर या प्लॅनची किंमत सध्या 199 रुपये आहे आणि 1 डिसेंबरपासून त्याची किंमत 239 रुपये असेल.
299 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनची किंमत 299 रुपये असणार आहे . प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.