सर्वच टेलिकॉम कंपन्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे रिचार्ज प्लॅन महागले आहेत, दरम्यान रिलायन्स जिओ त्यांच्या तीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅक ऑफर करत आहे. ही ऑफर जिओच्या काही खास तीन रिचार्ज प्लॅन्सवर देण्यात येते आहे.
या तीन प्लॅनमध्ये 719, 666 आणि 299 चा प्लान समावेश आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांपासून ते 84 दिवसांपर्यंत असून तुम्ही या कॅशबॅकचा वापर रिलायन्स रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन चॅनेल्सवरुन कोणतीही वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी करू शकता. यामध्ये Jio recharge, JioMart, Reliance Smart, Ajio, Reliance Trends, Reliance Digital, Netmeds इत्यादींचा समावेश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ग्राहकांना दररोज 200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
जिओच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 719 रुपयांचा प्लॅन, 666 रुपयांचा प्लॅन आणि 299 रुपयांचा प्लॅन वर ही ऑफर मिळणार आहे. दरम्यान तुम्हाला 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो, दररोजचा डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते. तसेच या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले आहेत. या रिचार्जमध्ये 20 टक्के JioMart कॅशबॅक आणि JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्ससह Jio सूटचे सबस्क्रिप्शन देण्यात येते.
666 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले आहेत. हा प्लॅन 84 दिवसांपर्यंत वैधता देतो. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील आहेत. या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे. हे दोन्ही रिचार्ज JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्ससह 20 टक्के JioMart कॅशबॅक आणि Jio suite चे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार रिचार्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत कॅशबॅक युजर्सच्या खात्यात जमा होतो. या ऑफरचा लाभ विविध रिलायन्स रिटेल चॅनेलद्वारे घेतला जाऊ शकतो. दरम्यान, अलीकडेच कंपनीने आपल्या अनलिमीटेड प्रीपेड प्लॅनमध्ये 480 रुपयांची वाढ केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.