Jio In-Flight Plans : विमान प्रवासादरम्यान बऱ्याचदा आपल्याला इंटरनेट वापरताना अडचणीचा सामना करावा लागतो. तुमचे फोन नेटवर्क बंद होते आणि मोबाइल कनेक्टिव्हिटी देखील बंद होते. अशा स्थितीत फोन बंद करावा लागतो. पण आता तुम्हाला हे करण्याची गरज भासणार नाही कारण आज आपण जिओच्या अशा प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही फ्लाइटमध्ये असतानाही इंटरनेट, कॉलिंग आणि एसएमएस वापरू शकता. या प्लॅन अंतर्गत फ्री आंतरराष्ट्रीय रोमिंगसह येतात. Jio 499 रुपये, 699 रुपये आणि 999 रुपये किंमतीचे 3 इन-फ्लाइट प्लॅन ऑफर करते. चला जाणून घेऊया या खास प्लॅन्सबद्दल...
499 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 1 दिवसाची वैधता, 100 मिनिटे आउटगोइंग कॉल्स, 250 MB मोबाइल डेटा आणि 100 SMS या उपलब्ध आहेत. या पॅकसह इनकमिंग एसएमएस फ्री आहेत परंतु इनकमिंग कॉल्सना परवानगी नाही. तसेच, इंटरनेटचा वेग देखील एअरलाइननुसार बदलतो.
699 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 100 मिनिटांचे आउटगोइंग व्हॉईस कॉल्स ऑफर करतो, हा प्लॅन 1 दिवसाच्या पॅक वैधतेसाठी 100 एसएमएससह 500MB डेटा देखील देते. या प्लॅनमध्ये इनकमिंग कॉलला परवानगी नाही, परंतु येणारे एसएमएस फ्री आहेत .याव्यतिरिक्त, इंटरनेटचा वेग प्रत्येक एअरलाइननुसार बदलतो.
999 रुपयांचा प्लॅन
या सर्वात महागड्या प्लॅनची किंमत इन-फ्लाइट नेटवर्क सेवेसाठी 999 रुपये आहे. या पॅकमध्ये 100 मिनिटे आउटगोइंग कॉल, 1GB मोबाइल डेटा आणि 100 SMS तसेच 1 दिवसाची वैधता देण्यात येत आहे.
जिओ इन-फ्लाइट प्लॅन्स कसे सुरू करावेत
इन-फ्लाइट प्लॅन सक्रिय करण्यासाठी, वापरकर्त्यांना फ्लाइट 20,000 फूट आणि त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचेपर्यंत वाट पहावी लागेल, त्यानंतर पुढील स्टेप्स फॉलो करा.
- प्लाइट मोड स्विच ऑफ करा आणि फोन स्विच ऑन करा.
- फोन ऑटोमॅटीकली एरोमोबाइल नेटवर्कशी कनेक्ट होईल. तुमचे डिव्हाइस नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकत नसल्यास, फोन सेटिंग्जमधील 'कॅरिअर' पर्यायावर जा आणि मॅन्युअली एरोमोबाइल ऑप्शन निवडा .तसेच, डेटा सर्व्हिस वापरण्यासाठी डेटा रोमिंग चालू असल्याची खात्री करा.
कनेक्टिव्हिटीनंतर, वेलकम टेक्स्ट आणि प्राइस इन्फॉर्मेशन दिली जाईल.
- इन-फ्लाइट प्लॅनचा वापर कॉल, टेक्स्ट, ईमेल आणि इंटरनेट सर्फ करण्यासाठी केला जाऊ शकतो.
- इन-फ्लाइट कॉल करण्यासाठी, '+' डायल करा, त्यानंतर कंट्री कोड, नंतर फोन नंबर एंटर करा. उदाहरणार्थ, तुम्हाला सिंगापूरहून भारतात कॉल करायचा असल्यास, +9170188999999 डायल करा.
या गोष्टी लक्षात ठेवा
जिओच्या या खास प्लॅन्सचा वापर करण्यासाठी प्रवाशांना फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी या प्लॅनचा रिचार्ज करावा लागेल. रिचार्ज करण्यापूर्वी, प्रवाशांनी एअरलाइन्स/आंतरराष्ट्रीय फ्लाइटची यादी तपासून पाहा ज्यामध्ये ते पाहिजे इन-फ्लाइट सेवा वापरू शकतात. पॅकचे फायदे फक्त जिओच्या पार्टनर एअरलाइन्स आणि डेस्टीनेशन्ससाठी लागू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.