नवी दिल्ली- जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक महत्वाचे प्लॅन (Jio internet data Plan) घेऊन येत असते. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक स्वस्त प्लॅन आणला असून तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त फायदे मिळणार आहेत. रिलायन्सने या कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगची (Jio Calling Plan) सुविधाही दिली आहे. जिओ आपल्या रिचार्ज प्लॅनसोबत जिओ ऍप्सला फ्री अॅक्सेस देणार आहे. ज्यात जिओ सिनेमा (JioCinema), जिओ सावन (JioSaavn) असे ऍप्स तुम्हाला वापरता येणार आहेत.
जिओचं नव्या वर्षात मोठं गिफ्ट; सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग
तुमच्या बजेटमध्ये असणारा प्लॅन तुम्ही शोधत असाल, तर जिओचा प्लॅन तुमच्यासाठीच आहे. जिओने या प्लॅनसोबत अनेक सुविधा दिल्या आहेत. जिओने 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनसोबत तुम्हाला कोणते फायदा मिळतील जाणून घ्या.
149 रुपयाच्या प्लॅनचे फायदे
जिओच्या 149 रुपयाच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला 24 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. ग्राहक 149 रुपयांचा रिचार्ज करुन दर दिवशी 1 जीबीचा डाटा मिळवू शकतो. याचा अर्थ ग्राहकांना 24 दिवसांमध्ये एकूण 24 जीबी डाटा मिळणार आहे. यासोबत 149 रुपयाच्या प्लॅनमध्ये दरदिवसासाठी तुम्हाला 100 SMS करता येणार आहेत.
प्लॅनसोबत Jio Apps चा Complementory Subscription मिळेल
प्लॅनसोबत ग्राहकांना जिओ ऍप्समध्ये मोफतमध्ये मिळेल. काँलिंगसाठी या प्लॅनमध्ये जीओ टू जीओ आणि इतर नेटवर्कसाठी फ्रीमध्ये कॉलिंग मिळत आहे. त्यामुळे तुम्ही कमी किमतीमध्ये जास्त फायदा घेऊ इच्छिता, तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे.
घरबसल्या पोर्ट करा Jio, Airtel आणि VI मध्ये आपला नंबर; जाणून घ्या प्रोसेस?
दरम्यान,रिलायन्स जिओने नव्या वर्षात ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. कंपनीने सर्व नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग फ्री करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने हे पाऊल टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आदेशानंतर उचललं आहे. ग्राहकांना या सुविधेचा फायदा 1 जानेवारी 2021 पासून मिळणार आहे. यामुळे आता जिओचे ग्राहक एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलच्या सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.