Jio Prepaid Plan : जिओने लाँच केले दोन नवे प्रीपेड प्लॅन्स, दररोज मिळतो 2.5GB डेटा अन् बरंच

jio launches 349 and 899 rupees prepaid recharge plans with unlimited call 2.5 gb daily data
jio launches 349 and 899 rupees prepaid recharge plans with unlimited call 2.5 gb daily data Sakal
Updated on

Jio Launched 349, 899 Rs Plans : रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. जिओने या दोन्ही प्लॅन त्यांच्या MyJio अॅप, वेबसाइट आणि इतर रिचार्ज प्लॅटफॉर्मवर लिस्ट केल्या आहेत. जिओच्या नवीन प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 349 रुपये आणि 899 रुपये आहेत. या प्लॅन्समध्ये कंपनी ग्राहकांना डेटा आणि अमर्यादित कॉल सारख्या सुविधा देत आहे.

Reliance Jio चा 349 रुपयांटा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या 349 रुपयांच्या पॅकमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स देखील देण्यात येत आहेत. या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 75 जीबी डेटा वापरू शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

jio launches 349 and 899 rupees prepaid recharge plans with unlimited call 2.5 gb daily data
टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकली मराठी पोट्टी!; 'मै नही तो कौन?' वाल्या सृष्टीसाठी चाहत्याची खास पोस्ट

जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. याशिवाय JioCinema, JioSecurity, JioTV आणि JioCloud चे सबस्क्रिप्शनही प्लॅनमध्ये मोफत दिले जात आहे. जिओचे म्हणणे आहे की या प्लॅनमध्ये जिओ वेलकम ऑफर अंतर्गत 5G डेटा देखील दिला जात आहे.

हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

jio launches 349 and 899 rupees prepaid recharge plans with unlimited call 2.5 gb daily data
Kasba Peth By-Election : कसब्यात अद्याप भाजपकडून उमेदवारी नाही; पण मुक्ता टिळकांचे पती म्हणाले...

Reliance Jio चा 899 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्याची वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2.5GB डेटा देत आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 225GB डेटा मिळेल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

या प्लॅनमध्ये 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. हा रिचार्ज प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलसह येतो. म्हणजेच जिओ ग्राहक या प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस आणि स्थानिक कॉलचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये JioSecurity, JioCloud, JioTV आणि JioCinema मध्ये एक्सेस फ्री उपलब्ध आहे. 5G नेटवर्क वापरणारे ग्राहकही या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.