JioSafe App : जिओने लाँच केलं देशातील पहिलं 5G कॉलिंग अ‍ॅप; व्हॉट्सअ‍ॅप अन् टेलिग्रामला देणार टक्कर, काय आहेत नवे फीचर्स

Jio 5G Messaging App : जिओने लॉंच केल देशातल पहिल 5g कॉलिंग मेसेजिंग एप; व्हाटसअप अन टेलिग्रामला देणार टक्कर, काय आहेत नवे फीचर्स
JioSafe 5G App
JioSafe 5G Appesakal
Updated on

JioSafe App Update : जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन सुविधा घेऊन येत असते नुकतेच त्यांनी वाढवलेल्या रिचार्ज दरांवर मात्र वापरकर्ते भडकले होते. पण आता जिओने देशातील पहिली अशी 5G वापरणारी मेसेजिंग आणि कॉलिंग अॅप म्हणजे JioSafe लॉंच केले आहे. भारतातील telecom क्षेत्रातील दिग्गज Jio कंपनीने आपल्या 4G आणि 5G सेवा आणखी सुविधांनी सज्ज करत आहे. यात JioSafe हा अत्याधुनिक सुरक्षित संवाद साधण्यासाठीचा अॅप आघाडीवर आहे. हा अॅप विशेषत: व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त आहे.

JioSafe हा Android आणि iOS दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. सध्या या अॅपसाठी दर महिना रु. 199 इतके शुल्क आहे. परंतु, सध्या विशेष ऑफर अंतर्गत पहिल्या वर्षासाठी मोफत आहे. Jio चे धोरण आहे की, व्हिडिओ कॉलिंगच्या सुरक्षित बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करावे.

JioSafe पाच स्तरांच्या सुरक्षा लेवलमध्ये बनले आहे. त्यामुळे Jio चे म्हणणे आहे की, हे अॅप हॅक करणे अशक्य आहे. वापरकर्ते या अॅपद्वारे मेसेज पाठवू शकतात, ऑडिओ कॉल करू शकतात आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकतात. पण, लक्षात घ्या JioSafe वापरण्यासाठी काही खास गोष्टींची आवश्यकता आहे ज्यामुळे तो बाकीच्या मेसेजिंग आणि कॉलिंग अॅपपेक्षा वेगळा ठरतो.

JioSafe 5G App
Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

या अॅपला चालण्यासाठी 5G स्मार्टफोन, Jio सिमकार्ड आणि 5G नेटवर्क लागते. जर यापैकी एखादीही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर हा अॅप चालणार नाही. म्हणजेच, Jio चे 4G वापरणारे ग्राहक JioSafe वापरू शकणार नाहीत. याशिवाय, सध्या JioSafe फक्त भारतातच उपलब्ध आहे. म्हणजेच, भारताबाहेर राहणारे वापरकर्ते हा अॅप वापरू शकणार नाहीत.

JioSafe वापरण्यासाठी अतिरिक्त 5G डाटा असलेळे प्लॅन असणेही आवश्यक आहे. पुढच्या वर्षापासून या अॅप वापरण्यासाठी दर महिना शुल्क भरावे लागणार आहे. JioSafe फक्त साइनअपसाठीच नाही तर प्रत्येक मेसेज आणि कॉलसाठी देखील 5G नेटवर्कची आवश्यकता आहे. हा अॅप वैयक्तिक आणि ग्रुप व्हिडिओ कॉल (सिक्योर रूम) ची सुविधा देतो. या ग्रुप कॉलमध्ये एकाच वेळी पाच जण सहभागी होऊ शकतात.

JioSafe 5G App
Jio Recharge Plans : 'या' Jio प्लॅन्समध्ये मिळवा Netflix आणि Amazon Prime फ्री!

JioSafe खरोखर सुरक्षित आहे का?

Jio कंपनीचा दावा आहे की, JioSafe हा पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण तो Jioच्या 5G नेटवर्कवर चालतो ज्याला भेदणे अशक्य आहे. JioSafe द्वारे केला जाणारा प्रत्येक कॉल एन्क्रिप्टेड असतो. त्यामुळे चोरी होण्याचा धोका नाही. 5G नेटवर्क हे 4G/3G/2G पेक्षा अधिक मजबूत असल्यामुळे JioSafe ची सुरक्षा आणखी वाढते.

Jio चे 5G स्टँडअलोन (SA) नेटवर्क हे 256-bit एन्क्रिप्शन आणि सब्सक्रायबर कॉन्सील्ड आयडेंटिटी (SCI) या तंत्रज्ञानाचा वापर करते. SCI वापरकर्त्याची ओळख लपवून ठेवते. या सर्व गोष्टींमुळे JioSafe हा एक सुरक्षित संवाद साधण्याचा अॅप म्हणून आशादायक वाटतो. JioSafe वापरकर्ते कोणत्या कॉन्टॅक्टशी सुरक्षित संवाद साधू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.