Recharge Plans: 5G डेटासाठी खर्च करावे लागणार फक्त 61 रुपये, 'या' कंपनीने लाँच केला स्वस्त प्लॅन

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने ६१ रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल.
Recharge Plans
Recharge PlansSakal
Updated on

Jio 61 Rs Recharge Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. जिओच्या या प्लॅनची किंमत फक्त ६१ रुपये आहे. जे यूजर्स ५जी मध्ये अपग्रेड करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा ठरेल.

जिओने काही दिवसांपूर्वीच ५जी सेवा सुरू केली आहे. तेव्हापासूनच यूजर्स ५जी प्लॅन्सची वाट पाहत आहेत. कंपनीने कोणतेही वेगळे रिचार्ज प्लॅन्स लाँच केलेले नाहीत. यूजर्सला ४जी प्लॅनमध्येच ५जी डेटाचा फायदा मिळतो. कंपनीने नवीन रिजार्ज प्लॅनला ५जी अपग्रेड नावाने सादर केले आहे.

Recharge Plans
Amazon Sale: महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात! Amazon वर चक्क निम्म्या किंमतीत मिळतायत बेस्टसेलर डिव्हाइस

Jio चा ६१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio ने यूजर्ससाठी अवघ्या ६१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा एक डेटा वाउचर आहे. यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स मिळत नाहीत.

६१ रुपयांच्या या रिचार्जमध्ये तुम्हाला ६जीबी ५जी डेटा मिळतो. सोबतच, यूजर्स अनलिमिटेड ५जी डेटा वापरण्यासाठी एलिजिबल ठरतील. या प्लॅनची वैधता तुमच्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅन एवढीच असेल.

जिओच्या ११९ रुपये, १४९ रुपये, १७९ रुपये, १९९ रुपये आणि २०९ रुपयांच्या प्लॅन्समध्ये देखील तुम्हाला ५जी डेटाचा फायदा मिळेल.

हेही वाचा: Recharge Plans: मस्तच! अवघ्या १९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ९० दिवस सुरू राहील सिम कार्ड, पाहा डिटेल्स

5G ऑफरचा घ्या फायदा

जर तुमच्याकडे ५जी फोन असेल व तुमच्या भागामध्ये जिओची ५जी सेवा सुरू झाली असल्यास तुम्ही हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा घेऊ शकता. देशातील प्रमुख शहरांमध्ये कंपनीची ५जी सेवा सुरू झाली आहे. यूजर्सने याचा फायदा घ्यावा यासाठी कंपनीने Jio Welcome Offer ची देखील घोषणा केली आहे. तुम्ही My Jio अ‍ॅपवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.