Jio Recharge Plans : जिओचा सुपर रिचार्ज प्लॅन! एकदम कमी दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन; दिवसाला 2GB डेटा अन् चक्क 84 दिवसांची वैधता

Jio Amazon Prime Video Subscription Recharge Plans : जिओने एकदम भारी,अफलातून असा रिचार्ज प्लॅन आणला आहे. दररोज 2GB हायस्पीड इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात.
Jio Amazon Prime Video Subscription Recharge Plans
Jio Amazon Prime Video Subscription Recharge Plansesakal
Updated on

Jio Mega Recharge : जिओच्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओने एकदम भारी,अफलातून असा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज 2GB हायस्पीड इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात. फक्त इतकंच नाही तर या रिचार्जमध्ये तुम्हाला Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

रिचार्ज प्लॅनचा दर काय?

जिओचा हा रिचार्ज प्लॅन फक्त 1029 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या रिचार्जमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी एकूण 168 GB डेटा मिळतो. म्हणजेच दररोज तुम्हाला 2 GB डेटा वापरण्यासाठी मिळतो. त्याचबरोबर या रिचार्जमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड देखील मोफत मिळतात. या सर्वांशिवाय जर तुमच्या शहरात किंवा परिसरात 5G नेटवर्क उपलब्ध असेल तर तुम्ही या रिचार्जमध्ये मोफत अनलिमिटेड ट्रू 5G डेटाचा देखील आनंद घेऊ शकता.

Jio Amazon Prime Video Subscription Recharge Plans
TATA Play Binge : 34 OTT ॲप्सचा खजिना फक्त 149 रुपयांपासून, अजून काय हवंय? ; टाटा प्ले बिंजची धमाका ऑफर!

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. तुम्ही आरामात मोबाईल वापर करू शकता. तसेच Amazon Prime ची मोफत सबस्क्रिप्शनमुळे तुम्हाला मनोरंजनाचाही डबल फायदा होतो.कारण Amazon Prime च्या सब्स्क्रिप्शनची किंमतदेखील जास्त आहे.त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन उत्तम आहे.यामध्ये भरपूर डेटा,मनोरंजन,एसएमएस आणि कॉलिंग सर्वकाही एकत्र मिळत आहे.

Jio Amazon Prime Video Subscription Recharge Plans
Redmi New Smartphone : Redmiच्या ब्रँड स्मार्टफोनची भारतात एंट्री; 7000 रुपयांपेक्षा कमी किंमत,फीचर्स अन् कॅमेराही एकदम खास

याशिवाय एका वृत्तानुसार, सरकारी दूरसंचार कंपनी MTNL ने BSNL सोबत करार केला आहे. या करारामुळे दिल्ली आणि मुंबईमध्ये MTNL वापरणाऱ्या ग्राहकांना आता 10 वर्षांसाठी 4G सेवा मिळणार आहे.

आत्ता सध्या सर्वत्र बीएसएनएलचे वारे वाहत आहे.कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्व खाजगी नेटवर्क कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांचा कल स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देणाऱ्या बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. अश्यात जिओचा हा आणि अन्य काही खास रिचार्ज प्लॅन्स ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.