Jio Smart Glass : जिओचे स्मार्ट ग्लासेस पाहिले का? 'गुगल-मेटा'लाही देतील टक्कर, जाणून घ्या फीचर्स

जिओने खरंतर गुगलसोबत मिळून हे ग्लासेस तयार केले आहेत.
Jio Smart Glass
Jio Smart GlasseSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 27 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन झाले. यामध्ये पंतप्रधानांनी जिओच्या स्पेस फायबर तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यासोबतच, यात पुन्हा एकदा Jio Glass ची चर्चा देखील सुरू झाली आहे. गेल्या वर्षी भारतात जिओ 5G लाँच करताना पंतप्रधानांनी हे जिओ ग्लासेस स्वतः वापरले होते.

जिओ ग्लासेस हे नवीन प्रॉडक्ट नाही. कंपनीने 2020 सालीच हे पहिल्यांदा समोर आणले होते. गुगल आणि मेटाने तयार केलेल्या स्मार्ट ग्लासेस प्रमाणेच हे जिओचे स्मार्ट ग्लास आहेत. हेदेखील आपल्या यूजर्सना ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (AR) आणि व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीचा (VR) अनुभव देतात.

Jio Smart Glass
Jio Space Fiber : आता अंतराळातून इंटरनेट पुरवणार जिओ; 'स्पेस फायबर' टेक्नॉलॉजी सादर

जिओने खरंतर गुगलसोबत मिळून हे ग्लासेस तयार केले आहेत. यामध्ये एक कॅमेरा, स्पीकर आणि दोन मायक्रोफोन देण्यात आले आहेत. यामध्ये 3D अवतार, होलोग्राफिक कंटेंट आणि नॉर्मल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा गोष्टी अनुभवता येतात. हे गॉगल आपल्या स्मार्टफोनला देखील कनेक्ट करता येतात. (Tech News)

अद्याप हे स्मार्ट गॉगल्स भारतात लाँच करण्यात आले नाहीत. याची लाँचिंग डेट आणि किंमत लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. गुगल आणि मेटाच्या स्मार्ट ग्लासेसच्या तुलनेत याची किंमत कमी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Jio Smart Glass
IMC 2023 : संपूर्ण जग आता 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन वापरतंय, ही अभिमानाची बाब! PM मोदींनी व्यक्त केला आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.