Jio vs Vi : दररोज 3GB डेटा देणारा कोणाचा प्लॅन आहे बेस्ट?

वापरकर्त्यांच्या अधिक डेटाची गरज लक्षात घेत, टेलिकॉम कंपन्या डेली 3 जीबी डेटा देणारे अनेक रिचार्ज प्लॅन देत आहेत
 jio vs vodafone idea wich daily 3gb data prepaid recharge plan of rs 601 best check comparison
jio vs vodafone idea wich daily 3gb data prepaid recharge plan of rs 601 best check comparison
Updated on

Prepaid Recharge Plan : वापरकर्त्यांच्या अधिक डेटाची गरज लक्षात घेत, टेलिकॉम कंपन्या डेली 3 जीबी डेटा देणारे अनेक रिचार्ज प्लॅन देत आहेत मात्र, प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत आणि फायदे कंपनीनुसार बदलतात. पण Jio आणि Vi (Vodafone Idea) कंपनीच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही कंपन्या एकाच किंमतीला 601 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. वरून पाहिल्यास, या दोन्ही कंपन्या या किंमतीमध्ये बेनिफिट्स देखील सारखेच देतात, परंतु जर काळजीपूर्वक पाहिले तर या दोन्ही प्लॅन एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत.

Jio किंवा Vi कोणत्या कंपनीचा 601 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल हे जाणून घेण्यासाठी आज आपण दोन्ही प्लॅनची ​​एकमेकांशी तुलना करणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला खात्री होईल की, कोणती टेलिकॉम कंपनी तुम्हाला त्याच किमतीत सर्वोत्तम बेनिफिट्स देईल.

जिओचा 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा 601 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. 28 दिवसांच्या वैधतेनुसार, हा प्लॅन तुम्हाला 84 GB डेटा ऑफर करतो. पण एवढेच नाही तर या व्यतिरिक्त कंपनी प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अतिरिक्त 6 GB डेटा देते. या अर्थाने, या प्लॅनमध्ये, तुम्हाला वापरण्यासाठी एकूण 90 GB डेटा मिळेल. इतर बेनिफिट्समध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली आहे. या व्यतिरिक्त, हा प्लॅन ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी पूर्णपणे फ्री डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देखील देतो.

 jio vs vodafone idea wich daily 3gb data prepaid recharge plan of rs 601 best check comparison
वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

Vi चा 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Vi च्या 601 रुपयांच्या प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे तर, प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्येही ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील आहे. या व्यतिरिक्त, हा प्लॅन ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देखील देते, तेही पूर्ण 1 वर्षासाठी.

वेगवेगळ्या बेनिफिट्सद्दल बोलायचे झाले तर, Jio च्या प्लॅनमध्ये, दररोज 3 GB डेटा व्यतिरिक्त, कंपनी अतिरिक्त 6 GB डेटा देत आहे. पण Vi कंपनी तुम्हाला या किमतीत 6 GB नाही तर 16 GB अतिरिक्त डेटा देते. या अर्थाने, या प्लॅनमध्ये तुम्हाला वापरण्यासाठी एकूण 100 GB डेटा मिळेल.

याशिवाय, Vi कंपनीच्या प्लॅनमध्ये “बिंज ऑल नाईट” आणि “वीकेंड रोल ओव्हर” ची सुविधा देखील समाविष्ट आहे. Binge All Night अंतर्गत, तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मोफत इंटरनेट सुविधा दिली जाते, जी तुमच्या दैनंदिन डेटा मर्यादेतून वजा केली जात नाही. याशिवाय, शनिवार आणि रविवारी वीकेंड रोलओव्हरमध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंतचा उर्वरित डेटा तुम्ही वापरू शकता.

 jio vs vodafone idea wich daily 3gb data prepaid recharge plan of rs 601 best check comparison
व्हॉट्सॲप मेसेज दोन दिवसांनंतरही करता येईल डिलीट, येतंय नवीन फीचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.