Jio देणार सर्वांना परवडणारी उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा

JIO
JIO esakal
Updated on
Summary

Jio देणार सर्वांना परवडणारी उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा; मुकेश अंबानींची घोषणा

नाशिक : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी जिओ (Jio) प्लॅटफॉर्म आणि जगभरातील उपग्रह- आधारित कनेक्टिव्हिटी कंपनी एसईएस (SES) यांनी सोमवारी जिओ स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड (Jio Space Technology Ltd) नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली. हा नवीन संयुक्त उपक्रम देशभरात उपग्रह आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून परवडणारी ब्रॉडबँड (Broadband) सेवा प्रदान करेल.

SES देईल 100 Gbps क्षमता

जिओ प्लॅटफॉर्मस आणि एसईएस यांच्या संयुक्त उपक्रमात अनुक्रमे 51% आणि 49% इक्विटी स्टेक ठेवतील. संयुक्त उपक्रम मल्टी-ऑर्बिट स्पेस नेटवर्कचा (Multi-Orbit Space Network) वापर करेल. या नेटवर्कमध्ये जिओस्टेशनरी (GEO) आणि मीडियम अर्थ ऑर्बिट (MEO) उपग्रहांचा वापर केला जाईल. नेटवर्कची मल्टि-गीगाबिट लिंक भारतासह शेजारील देशांतील एंटरप्राइझ, मोबाइल आणि किरकोळ ग्राहकांना जोडण्यास सक्षम करेल. यामुळे आता अतिदुर्गम भागात देखील ब्रॉडब्रॅण्ड सेवेचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे.

JIO
टीव्ही रिमोटने बंद करत असाल तर... ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

एसईएस 100 Gbps क्षमता प्रदान करेल ज्याची जिओ त्याच्या मजबूत नेटवर्कद्वारे विक्री करेल. गुंतवणुकीच्या योजनेचा एक भाग म्हणून, संयुक्त उपक्रम भारतात सर्वसमावेशक गेटवे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करेल, ज्यामुळे देशात सेवा प्रदान करण्यात येईल. या करारांतर्गत, जिओ पुढील काही वर्षांत सुमारे $100 दशलक्ष किमतीचे गेटवे आणि उपकरणे खरेदी करेल. संयुक्त उपक्रमात, जेथे एसइएस आपले आधुनिक उपग्रह प्रदान करेल, जिओ गेटवे पायाभूत सुविधांचे संचालन आणि व्यवस्थापन करेल.

अनेक संधी उपलब्ध होतील

कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 (Covid -19) ने आम्हाला हे शिकवले आहे की नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेत पूर्ण सहभागासाठी ब्रॉडबँडचा वापर आवश्यक आहे. हा संयुक्त उपक्रम भारताला डिजिटल सेवांशी जोडेल. तसेच दूरस्थ आरोग्य, सरकारी सेवा आणि दूरस्थ शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे शक्य होईल.

प्रत्येक नागरिकांपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी

एका प्रसिद्धीपत्रकात कंपनीने म्हटले आहे की, हा संयुक्त उपक्रम पंतप्रधानांच्या 'गती शक्ती: नॅशनल मास्टर प्लॅन ऑफ मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी'ला पुढे नेण्यासाठी एक वाहन असेल. पायाभूत सुविधा मजबूत करून एकात्मिक आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे. हे भारतीय नागरिकांपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी वाढवून, राष्ट्रीय डिजिटल कम्युनिकेशन्स पॉलिसी आणि डिजिटल इंडिया कार्यक्रमातील कनेक्ट इंडियाची उद्दिष्टे वेगाने वाढवेल.

Jioचे संचालक आकाश अंबानी (Akash Ambani) म्हणतात,

“आम्ही आमच्या फायबर-आधारित कनेक्टिव्हिटी आणि FTTH व्यवसायासह 5G मध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवू. दुसरीकडे एसइएससह हे नवीन जॉईंट व्हेंचर मल्टिगिगाबिट ब्रॉडबँडच्या वाढीला अधिक गती देईल. उपग्रह संप्रेषण सेवा प्रदान करून अतिरिक्त कव्हरेज आणि जोडल्या जाणार्‍या क्षमतेसह, जिओ दुर्गम शहरे आणि गावे, उपक्रम, सरकारी आस्थापना आणि ग्राहकांना नवीन डिजिटल इंडियाशी जोडेल. आम्ही उपग्रह उद्योगातील एसईएसच्या कौशल्यासह भागीदारी करण्यास उत्सुक आहोत.”

JIO
फ्री फायरसह तब्बल 54 प्रसिध्द चिनी अ‍ॅप्सवर बंदी, येथे पाहा यादी

"जिओ प्लॅटफॉर्मसह हा संयुक्त उपक्रम उच्च दर्जाची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी आणि लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी एसईएस सर्वात व्यापक तळागाळातील नेटवर्कला कसे पूरक ठरू शकते याचे उत्तम उदाहरण आहे. याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आम्ही या संयुक्त उपक्रमासाठी खुले आहोत." - स्टीव्ह कॉलर, एसईएस CEO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.