रिलायन्स जिओने इंडिया मोबाईल काँग्रेस 2023 मध्ये 'जिओफोन प्राईमा 4G' हा मोबाईल लाँच केला होता. याची विक्री आता सुरू झाली आहे. या फोनमध्ये कित्येक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामधून यूपीआय पेमेंट करणं शक्य होणार आहे. तसंच यात गुगल व्हॉइस असिस्टंट आणि ओटीटी अॅप्स देखील उपलब्ध आहेत.
सध्या 2G किंवा 3G फीचर फोन वापरणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम अपग्रेड ठरणार आहे. तसंच, केवळ यूपीआय पेमेंटसाठी स्मार्टफोन घेण्याचीही गरज भासणार नाही. या फोनची किंमत अवघी 2,599 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि अमेझॉनवर उपलब्ध आहे.
या फोनमध्ये 2.4 इंच मोठी डिस्प्ले मिळते. हा फोन 23 स्थानिक भाषांना सपोर्ट करतो. यामुळे इंग्रजी येत नसलेले व्यक्ती देखील हा फोन वापरू शकतील. यामध्ये 1800 mAh क्षमतेची बॅटरी मिळते, जी दिवसभर पुरते असा दावा कंपनीने केला आहे.
JioPhone Prima 4G फोनमध्ये 0.3MP क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 512Mb रॅम दिली आहे. तसंच याचं स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येते. (Tech News)
या फोनमध्ये यूपीआय पेमेंट ऑप्शन, गुगल व्हॉइस असिस्टंट असे फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच व्हॉट्सअॅप, फेसबुक असे अॅप्स देखील इनबिल्ट मिळतात. सोबतच जिओ सिनेमा आणि इतर ओटीटी अॅप्स देखील देण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.