Alert : पुन्हा एकदा जोकर व्हायरसचा धोका, लगेच डिलीट करा हे अ‍ॅप

Joker Virus
Joker Virus
Updated on

पुन्हा एकदा जोकर मालवेअर (Joker Malware) प्ले स्टोअरमधील (Play Store) अनेक अ‍ॅप्सना संक्रमित करत आहे. तुम्ही सुद्धा अँड्रॉइड फोन (Android Phone) वापरत असाल तर लगेच तुमचा फोन तपासा. कारण जोकर मालवेअर केवळ तुमचा डेटाच नाही तर पैसेही चोरू शकतो.  

जोकर मालवेअर हा गुगल प्ले स्टोअरमधील हा सर्वात धोकादायक अँड्रॉइड व्हायरस (Android Virus) आहे. हे 2017 मध्ये पहिल्यांदा आढळला होता. 2019 मध्ये, Google ने लोकांना चेतावणी देणारा एक ब्लॉग पोस्ट केला ज्यामध्ये जोकर मालवेअर पासून कसे सुरक्षित राहावे ते सांगण्यात आले होते.

आता हा व्हायरस एका अ‍ॅपमध्ये सापडला आहे जे 5 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहे. म्हणजेच, जोकर व्हायरसमुळे आता लाखो अँड्रॉइड वापरकर्ते प्रभावित होऊ शकतात. गुगल प्ले स्टोअरवर कलर मेसेज (Color Massage) नावाचे हे अ‍ॅप आहे जे जोकर मालवेअरने संक्रमित आहे. या अ‍ॅपचा दावा आहे की ते तुमचे मेसेजिंग कलरफुल बनवते आणि इमोजी तयार करण्यातही मदत करते.

Joker Virus
३० किलो डायनामाइटने उडवली ७५ लाखांची टेस्ला; कारण ऐकून व्हाल थक्क

मोबाईल सिक्युरिटी फर्म Pradeo च्या रिपोर्टनुसार, हे अ‍ॅप Joker मालवेअर संक्रमित झाले असून या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये आलेला हा मालवेअर तुम्हाला पेड सर्व्हिसचे सबस्क्रिप्शन घेण्यास भाग पाडत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा मालवेअर गेल्या एक वर्षापासून या अ‍ॅपमध्ये आहे आणि हे अ‍ॅप अजूनही गुगल प्ले-स्टोअरवर आहे.

जोकर मालवेअर असलेले कलर मेसेज अ‍ॅपडाऊनलोड केलेल्या पाच लाख लोकांपैकी तुम्हीही असाल, तर अ‍ॅप त्वरित अनइंस्टॉल करा, याशिवाय, Google Play-Store वर जा आणि सबस्क्रिप्शन तपासा आणि रद्द करा. यासाठी गुगल प्ले स्टोअर ओपन करा आणि सबस्क्रिप्शन मेनूवर जा. तुम्ही घेतलेली प्रत्येक सबस्क्रिप्शन बरोबर आहे हे येथे तपासा. शंका असल्यास, सबस्क्रिप्शन त्वरित रद्द करा.

Joker Virus
बजेटमध्ये मिळाणारे बेस्ट स्मार्टफोन्स, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.