AI Chatbot for Students : आता शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणार 'एआय'; कानपूर IIT विकसित करतंय स्वदेशी चॅटबॉट!

Kanpur IIT : 'सारथी' पोर्टलवर हा चॅटबॉट उपलब्ध होईल.
AI Chatbot for Students
AI Chatbot for StudentseSakal
Updated on

सध्या सगळीकडे एआयचा बोलबाला सुरू आहे. चॅटजीपीटी नंतर कित्येक चॅटबॉट्स लोकांना विविध क्षेत्रांमध्ये मदत करत आहेत. यातच आता विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे.

कानपूर आयआयटी एक नवीन चॅटबॉट विकसित करत आहे, जो नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत करणार आहे. 'सारथी' पोर्टलवर हा चॅटबॉट उपलब्ध होईल. देशातील कोणत्याही राज्यात असलेल्या विद्यार्थ्यांना हे एआय टूल फायद्याचं ठरणार आहे.

AI Chatbot for Students
Maya OS : सुरक्षा मंत्रालयाच्या सर्व कम्प्युटरमध्ये विंडोज ऐवजी स्वदेशी 'माया' ओएस; सायबर हल्ल्यांपासून मिळणार सुरक्षा!

कसा असणार चॅटबॉट?

या एआय चॅटबॉटमध्ये अभ्यासक्रमासंबंधित सर्व माहिती अपलोड करण्यात येईल. तसंच, याबाबत इतर माहिती आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नातूनच हा चॅटबॉट स्वतःला विकसित करेल. यामध्ये एखादा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर मिळेल. ही उत्तरं प्री-रेकॉर्डेड नसतील, तर एआय स्वतःच्या बुद्धीने ही उत्तरं देईल.

ग्रामीण भागात फायदा

ग्रामीण भागामध्ये या चॅटबॉटचा अधिक फायदा होणार आहे. तसंच, विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठीही याचा उपयोग होईल. शिक्षक उपलब्ध नसताना विद्यार्थी या चॅटबॉटला आपले प्रश्न विचारू शकतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

AI Chatbot for Students
Made in India: मोदी सरकारचा मोठा निर्णय! गुगलशी स्पर्धा करण्यासाठी उभारणार 'आत्मनिर्भर' वेब ब्राउझर

तीन महिन्यात होणार उपलब्ध

येत्या तीन महिन्यांमध्ये मोदी सरकारच्या 'सारथी' पोर्टलवर हा चॅटबॉट उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य आयआयटी कानपूरने ठेवलं आहे. यामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी एक मोठं टूल उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.