Karizma, Avenger आणि Yamaha R3 बाईक नव्याने मारणार एंट्री

गेल्या २ ते ३ वर्षात Yezdi आणि Jawa सह अनेक बाइक्सला भारतात आणले गेले
Karizma, Avenger
Karizma, Avenger esakal
Updated on

Karizma, Avenger : गेल्या २ ते ३ वर्षात Yezdi आणि Jawa सह अनेक बाइक्सला भारतात आणले गेले आहे. खरं म्हणजे बजाजने मार्केट पुन्हा काबीज करण्यासाठी Pulsar 220F ला पुन्हा लाँच केले आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा टॉप ३ बाइक्स संबंधी माहिती देत आहोत. याची काही वर्षात पुन्हा दणक्यात पुनरागमन होत आहे.

Karizma, Avenger
Parenting Tips : तुमचे मुलांनाही येतोय का अभ्यासाचा कंटाळा? या Tricks अवलंबून बघाच, मुलांमध्ये नक्की फरक पडेल!

Yamaha R3

यामाहाचे टार्गेट बाजारात प्रीमियम बाइक्सची एक मोठी रेंज पुन्हा येणार आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Yamaha 2023 मध्ये बाजारात R3 फुली-फेयर्ड बाइकला पुन्हा लाँच करू शकते. बाइकला नुकतेच ग्लोबल मार्केटमध्ये नवीन स्लिक एलईडी इंडिकेटर आणि एक नवीन पर्पल कलर मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.

Karizma, Avenger
Electric Cars : भारतातील सर्वात स्वस्त टॉप ५ इलेक्ट्रिक कार

हे लिक्विड कूल्ड, 321cc, पॅरेलल ट्विन इंजिनवर बेस्ड आहे. जे 42bhp चे पॉवर आणि 29.5Nm चे टॉर्क जनरेट करते. नवीन Yamaha R3 ची टक्कर KTM RC 390, BMW G 310 RR आणि Kawasaki Ninja 400 शी होईल.

Bajaj Avenger 220 Street

बजाज सध्या बाजारात एवेंचर २२० क्रूझची विक्री करीत आहे. ही Bajaj Avenger 220 Street पुन्हा आणली जाण्याचा प्लान आहे. त्या एयर/ऑयल-कूल्ड, 220cc, सिंगल-सिलेंडर इंजिनवर बेस्ड आहे. जो 19bhp ची पॉवर आणि 17.55Nm चे टार्क जनरेट करते. या बाइक मध्ये ५ स्पीड गियरबॉक्स दिले आहे. सस्पेंशन ड्युटीसाठी बाइकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रियर मध्ये ट्विन शॉक एब्जॉर्बर आहे. बाइकमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम मिळेल.

Karizma, Avenger
Ducati Bikes Discounts : डुकाटीच्या बाइकवर मिळणार ४ लाखांचा डिस्काउंट

Hero Karizma

हिरो मोटोकॉर्प सध्या भारतात XPulse 400 आणि नवीन Karizma सह नवीन बाइक्सची टेस्टिंग करीत आहे. नेक्स्ट झेन हिरो करिज्मा एक फुली फेयर्ड बाइक असेल. ज्यात लो सेट हँडलबार असेल. जो स्पोर्टी रायडिंग पोझिशन देईल. फुली फेयर्ड बाइकमध्ये एक छोटी विंडस्क्रीन असेल. रियरमध्ये स्ल्पिट सीट सोबत एक स्लीम सेक्शन आणि हिट शील्ड सोबत एक छोटा एग्जोस्ट असेल. बाइक मध्ये ड्युअल चॅनेल एबीएस सोबत दोन्ही व्हीलवर डिस्क ब्रेक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.