Kawasaki Eliminator 500 : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कावासाकीने आपली एक दमदार बाईक लाँच केली आहे. एलिमिनेटर 500 असं या बाईकचं नाव आहे. सॉलिड बॉडी, स्टायलिश डिझाईन आणि पॉवरफुल इंजिन असणारी ही बाईक कित्येकांना पसंत पडत आहे.
या बाईकमध्ये 451 सीसी क्षमतेचं पॅरलल ट्विट इंजिन देण्यात आलं आहे. हे 9,000 RPM वर 45Ps पॉवर जनरेट करु शकतं. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसंच, यात 13 लीटरचा फ्युअल टँक उपलब्ध आहेत. या गाडीचं मायलेज 25 किलोमीटर प्रति लीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (New Kawasaki Bike)
नव्या एलिमिनेटर बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट आणि ड्युअल मोनोशॉक रिअर अॅब्जॉर्बर देण्यात आले आहेत. तसंच यात 310 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 240 mm रेअर डिस्क ब्रेक दिला आहे. अगदी मस्क्युलर लुक असणाऱ्या या गाडीचं वजन 176 किलो आहे.
या बाईकमध्ये कित्येक हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. एलईडी लाईट्स, साईड स्टँड सेन्सर, कॉल-मेसेज अलर्ट, डिजिटल कन्सोल असे फीचर्स यामध्ये आहेत.
कावासाकी एलिमिनेटरची किंमत 5.62 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम, दिल्ली) सुरू होते. सध्या ही बाईक फ्लॅट स्पार्क ब्लॅक या एकाच रंगात उपलब्ध आहे. भारतात याची डिलिव्हरी जानेवारीच्या मध्यापासून सुरू होणार आहे. (Kawasaki Eliminator Price)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.