नवीन कार खरेदी करताय? त्याआधी या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

buying new car
buying new carGoogle
Updated on

बऱ्याच जणांना दररोजच्या कामासाठी कारची गरज असेत. व्यस्त जीवनात तुमचा वेळ वाचवण्यात कार खूप उपयोगी ठरते आणि त्याच वेळी कुटुंबासोबत प्रवासाठी देखील स्वतःची कार हवी असते. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, तुम्ही नवीन कार खरेदी करताना किती काळजी घ्यावी आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन खरेदी करावी हे आज आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही...

कार खरेदीसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स...

कारची माहिती ऑनलाइन तपासा

सर्वप्रथम, तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या कारची माहिती ऑनलाईन मिळवा, जिथे तुम्हाला तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. एवढेच नाही तर ऑनलाइन निवडलेल्या कारसोबत इतर कारची तुलनाही करू शकता. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, फोर्ड, किया, फोक्सवॅगन, टोयोटा, होंडा, निसान, रेनॉल्टसह अनेक कार कंपन्या आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीची कंपनी काळजीपूर्वक निवडा.

कुटुंबातील सदस्यां संख्येनुसार कार निवडा

तुमच्या आवडीची कार निवडल्यानंतर, तुम्ही एकदा खात्री करून घेतली पाहिजे की ती कार तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे का, तसेच कुटुबातील व्यक्तींच्या संख्येनुसार योग्य अशी कार निवडा. तुमचे कुटुंब लहान असल्यास हॅचबॅक कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. दुसरीकडे, जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या 5 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही 7 सीटर कार घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही एकावेळी संपूर्ण कुटुंबासह सहलीचा आनंद घेऊ शकाल.

buying new car
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

कारच्या मेंटेनन्स खर्चाबद्दल माहिती घ्या

कार खरेदी केल्यानंतर मेंटेनन्स आणि मायलेजचा खर्चाचा भार तुम्हाला उचलावा लागतो, त्यामुळे तुमच्या आवडीची कार निवडताना तिचे मायलेज आणि मेन्टेनन्स कॉस्ट नक्की समजून घ्या, डिझेल कारचा मेंटेनन्स पेट्रोल कारपेक्षा जास्त असतो. त्यामुळे कार खरेदी करताना मेंटेनन्स आणि मायलेजची पुरेपूर काळजी घ्या.

विमा काढताना..

कार खरेदी करताना विमा घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जवळजवळ सर्व कंपन्या त्यांच्या डीलरद्वारे कार विमा देतात, त्यामुळे जर तुम्ही बाहेरून कमी किमतीत विमा मिळत असेल तर तुमच्याकडे बाहेरून विमा घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल.

buying new car
आसामच्या 'मनोहारी गोल्ड' चहाला सोन्याचा भाव! किलोसाठी विक्रमी बोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.