किआची सेव्हन सिटर 'केरेन्स' कार भारतात होणार लाँच

कंपनीने कारचे स्केच जाहीर केले आहे.
carens car
carens car
Updated on

प्रणित पवार

मुंबई : किआ इंडिया मोटर्सने आपल्या बहुचर्चित कॅरेन्स या सात आसनी एसयुव्ही कारचे स्केच मंगळवारी (ता. ७ डिसेंबर) प्रसिद्ध केले. आकर्षक इंटेरिअर, स्मार्ट कनेक्टिव्हीटी फिचर्स, बोल्ड एक्सटेरिअर आणि ऐसपैस आसन व्यवस्था आदी वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या या कारचे लाँचिंग १६ डिसेंबरला गुरुग्राम (नवी दिल्ली) येथे होणार आहे. सेल्टॉस, कार्निव्हल, सोनेटनंतर किआ भारतात कॅरेन्सच्या माध्यमातून आपली चौथी कार भारतात दाखल करत आहे.

    किआ कॅरेन्सची रचना ज्यांना एकत्र प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे अशा आधुनिक भारतीय कुटुंबांच्या विकसित, अपूर्ण गरजा लक्षात घेऊन केली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. किआने कॅरेन्सच्या माध्यमातून कंपनीचे 'ऑपोजिट्स युनायटेड' हे नवीन डिझाईन तंत्रज्ञान भारतात आणले आहे. समोरून टायगर फेस डिझाइन, हायलाईट केलेले इनटेक ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) यांमुळे केरेन्सला प्रभावी लूक प्राप्त होतो.

      कॅरेन्सच्या इंटिरिअरची रचना भारतातील गतिशील जीवनशैलीच्या गरजा आणि दैनंदिन वापरातील प्राधान्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. १०.२५ इंचीचा ऑडिओ व्हिडिओ नेव्हिगेशन टेलीमॅटिक्स (AVNT) डॅशबोर्डच्या मध्यभागी देण्यात आला असून, जो आधुनिक अनुभव देत असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. या कारची किंमत आणि इंजिनबाबतची माहिती अद्याप जाहीर केली नसली तर, १६ डिसेंबरला यावरून पडदा हटण्याची शक्यता आहे.

carens car
या आहेत देशातील बेस्ट आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्स
carens car
carens car

'भारतीयांवर प्रभाव टाकणार'

किआ कॅरेन्स आमच्या नवीन डिझाइन तंत्रज्ञान 'ऑपोजिट्स युनायटेड' ला पूर्णपणे मूर्त रूप देते. ते अत्याधुनिक व्यक्तिमत्त्व आणि अद्वितीय सौंदर्यशास्त्रासह स्पोर्टीनेसची यशस्वीरित्या जोड देते. भारतीय ग्राहकांना त्यांच्या तीन-रो व्हेईकलमधून काय हवे, त्यावर किआ कॅरेन्स प्रभाव टाकण्यास यशस्वी होईल, असा विश्वास किआ डिझाइन सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख करिम हबिब यांनी व्यक्त केला.

carens car
टाटाच्या 'या' कार्सवर मिळतोय जबरदस्त डिस्कांउट; पाहा डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.