एकीकडे पेट्रोल- डिझेल सारख्या इंधनाचे दर दिवसाला वाढत आहेत. त्यातच लवकरच इंधन तुटवडा Fuel Deficiency निर्माण होवू शकतो. अशी भिती निर्माण झाल्याने आता जगभरामध्ये इंधनाला विविध पर्याय शोधले जात आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून फ्लेक्स फ्लूएल Flex Fuel हे नाव चांगलंच चर्चेत आहे. Know about flex fuel benefits automobile news in Marathi
इंधनात बचत व्हावी यासाठी अनेक देशांनी फ्लेक्स फ्यूएलच्या वापरावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
फ्लेक्स फ्यूएल नाव चर्चेत आल्यापासून अनेकांना हे फ्यूएल किंवा इंधन Fuel नेमकं काय आहे? ते कसं किंवा कशापासून तयार केलं जातं? फ्लेक्स फ्यूSलच्या वापराचे फायदे तोटे काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
फ्लेक्स फ्यूएल हे पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल Ethanol मिसळून तयार केलं जातं. फ्लेक्स फ्यूएलमध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिसळण्यात आलंय. यावर त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा गटवारी ठरवण्यात आली आहे. तुम्ही E5, E10 किंवा E20 पेट्रोलचं नाव ऐकलं असेल. हे एका प्रकारचं फ्लेक्स फ्यूएल आहे.
जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल या इंधनामध्ये १० टक्के इथेनॉलचा वापर करून ते तयार करण्यात येतं तेव्हा त्याला E 10 Flexi Fuel म्हणतात. तर जर इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल असल्यास E 20 आणि ८५ टक्के इथेनॉल असल्यास E -85 म्हंटलं जातं.
हे देखिल वाचा-
कारच्या इंजिनवर परिणाम होतो का?
फ्लेक्स फ्यूएलमध्ये इथेनॉल असल्याने या इंधनाच्या वापरामुळे कारच्या इंजिनवर परिणाम तर होणार नाही ना? किंवा इंजिन बिघडेल का, असे सवाल अनेकांच्या मनात निर्माण होवू शकतात. तर फ्लेक्स फ्यूएल हे कोणत्याही कारमध्ये वापरता येत नाही. फ्लेक्स फ्यूएलच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार म्हणजेच E5, E10, E20 या फ्यूलच्या वापरासाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार इंजिन तयार करण्यात आलेलं असतं. त्यामुळे या इंधनाच्या खास तयार कऱण्यात आलेल्या इंजिनवर कोणताही परिणाम होत नाही.
भारतात ८६ टक्के पेट्रोल-डिझेल हे कच्च्या तेलाच्या स्वरुपात आयात केलं जातं. इंधनाची ही आयात कमी करण्यासाठी फ्लेक्स फ्यूएलच्या वापरावर भारताने भर देण्यास सुरुवात केली आहे. यासाठीच केंद्र सरकारने भारतात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल भारतात लॉन्च केलं असून २०२५ सालापर्यंत ते सर्वत्र उपलब्ध होईल यासाठी योजना आखल्या आहेत. सध्या देशातील १३५० पेट्रोल पंपांवर फ्लेक्स फ्यूएल उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांचा फायदा
फ्लेक्स फ्यूलच्या वापरामुळे इंधनाच्या आयातीवरील खर्चात बचत होण्यासोबतच प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. सोबतच यामुळे शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार आहे. कारण फ्लेक्स फ्यूएलसाठी इथेनॉलची आवश्यकता वाढणार असून हे इथेनॉल तयार करण्यासाठी शेतमालाची आवश्यकता भासते.
इथेनॉल हे उसाचा रस, रताळे, बटाटा, गोड ज्वारी आणि मका यापासून तयार कऱण्यात येतं. तसंच तांदूळ, गव्हाचा भुसा आणि मका या पदार्थांपासून देखील इथेनॉल बनवलं जातं. फ्लेक्स फ्यूएलमुळे इथेनॉलची मागणी वाढल्याने अर्थातच या शेतमालाची देखील मागणी वाढेल, ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकेल.
अशा प्रकारे येत्या काळात फ्लेक्स फ्यूएलचा वापर वाढल्यास आयातीवरील खर्च कमी झाल्याने पेट्रोलच्या वाढत्या किमती नियंत्रणात राहण्यासोबतच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. सोबत देशातील शेतकऱ्यांना देखील अधिकचं उत्पन्न मिळवण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.