Plane toilet system works: विमान प्रवास हा प्रत्येकासाठीच रोमांचक असतो. एकदा तरी विमान प्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर विमान प्रवास Air Travel तसचं विमानातील अनेक गोष्टींबद्दल आपल्या मनात कुतुहल असतं.
त्याचप्रमाणे काही सामान्य प्रश्न अनेकांच्या मनात सतत डोकावत असतात. त्याचपैकी एक म्हणजे विमानातील टॉयलेटमधील Toilet मल किंवा घाण नेमकी कुठे जाते? Know about Toilet System in Air Planes
विमानातील टॉयलेटमध्ये Toilet म्हणजेच शौचालयामध्ये लिहलेली सुचना "बसल्यावर फ्लश करू नका" या मागचं कारण काय? तसंच या शौचालयातील पाणी Water निळं का असतं?
शौचालयातील गोठलेला मल खरोखरच हवेतून खाली किंवा समुद्रात खाली फेकला जातो का? असे अनेक प्रश्न तुमच्यापैकी काहींना पडत असतील. तर आज आम्ही तुमच्या या शंका दूर करून तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहोत.
१९७५ सालामध्ये जेम्स केम्पर यांनी विमानातील टॉयलेट अधिक सोयीचं व्हावं यासाठी व्हॅक्यूम टॉयलेट पेटंटचा शोध लावला.
१९८२ सालामध्ये बोईंग विमानांमध्ये या टॉयलेटचा वापर करण्यात आला. या टॉयलेटसाठी त्यांनी एक नॉनस्टिक कमोड तयार केला तर फ्लशसाठी स्कायकेम नावाचा निळा पदार्थ वापरला. या पदार्थाला ब्लू आइस असं म्हंटलं जातं. तसचं यासाठी त्यांनी व्हॅक्यूम सक्शन प्रणालीचा वापर सुरू केला.
इथे जातं विमानाच्या टॉयलेटमधील मलमूत्र
घरांमध्ये असलेल्या टॉयलेट सिस्टिमपेक्षा विमानातील टॉयलेट सिस्टिम ही खूप वेगळी असते. विमानातील शौचालयामध्ये ब्लू आईस आणि व्हॅक्यूम प्रणालीच्या मदतीने मलमूत्र स्वच्छ केलं जातं. यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लू आइसमुळे दुर्गंधी देखील दूर होते.
सगळ्याच महत्वाचं म्हणजे हे मलमूत्र आकाशातून खाली टाकलं जात नाही. तर तुम्ही फ्लश करताच हे मलमूत्र आणि ब्लू आईसच्या मदतीने स्वच्छ होतं आणि व्हॅक्यूम सक्शनच्या मदतीने विमानातील कार्गो होल्डच्या बरोबर मागे असलेल्या एका मोठ्या टँकमध्ये जमा होतं.
विमानात एका वेळी ४०० ते ५०० प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांचं मलमूत्र या टाकीमध्ये Tank साठवलं जातं. यावरूनच ही टाकी किती मोठी असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.
जेव्हा तुम्ही फ्लश करता तेव्हा टॉयलेटमधील व्हॅक्यूम यंत्रणा सक्रिय होते. हे व्हॅक्यूम प्रचंड शक्तीशाली असल्यानेच फ्लश केल्यानंतर मोठा आवाज होतो. यामुळे मलमूत्र व्हिक्यूमच्या मदतीने थेट खेचून टाकीत नेलं जातं. त्यामुळेच सीटवर बसलेलं असताना फ्लश करू नये अशी सुचना दिली जाते.
हे देखिल वाचा-
विमान लॅण्ड झाल्यावर मलमूत्राचं काय केलं जातं
विमानाच्या टाकीत साठलेलं मलमूत्र पायलेट किंवा विमानातील कर्मचारी कोणत्याही प्रकारे बाहेर टाकू शकत नाही. विमान लॅण्ड झाल्यावरच हा टँक स्वच्छ केला जातो.
विमान धावपट्टीवर उतरल्यावर या टाकीजवळ एक ट्रक उभा केला जातो. हे ट्रक विमानाला एक रबरी नळी जोडतात. या नळीच्या मदतीने टँकमधील कचरा आणि निळा पदार्थ म्हणजेच ब्लू आइस ट्रकमध्ये टाकला जातो.
विमानाची टाकी रिकामी केल्यानंतर तिला एक दुसरी नळी जोडली जाते आणि तिचं निर्जंतुकीकरण केलं जातं. त्यानंतर हे ट्रक सर्व विमानांमधील कचऱ्यासाठी आरक्षित असलेल्या विशेष क्षेत्रामध्ये नेला जातो. इथं असलेल्या सीवर सिस्टममध्ये हे मलमूत्र रिकामं केलं जातं.
मलमूत्राचं निळ्या बर्फात रुपांतर
पायलेट किंवा विमान कर्मचारी ही टाकी रिकामी करू शकत नसले तरी काही वेळस खास करून जुन्या विमानांमध्ये टाकीला नळी जोडण्यासाठी असलेल्या वॉल्वमधून ही घाण बाहेर येऊ शकते.
या टाकीतील मलमूत्राचं बर्फामध्ये रुपांतर होतं. विमान ३० हजारा फूटांहून अधिक उंचीवर असताना तापमान -५६ अंशांपर्यंत असतं. यावेळी ब्लू आइसच्या प्रभावामुळेही मलमूत्र बर्फात बदलतं.
विमान जमिनीवर उतरत असताना या मलमूत्राचं तापमान पुन्हा कमी होवू लागतं आणि ते वितळू लागतं. अशा वेळी काहीवेळेस वॉल्वमधून ही घाण लिक होण्याची शक्यता असते.
एकंदर विमानातील मलमूत्र आकाशातून खाली विसर्जित केलं जात नाही. टॉयलेटमधील फ्लशमधून येणारा आवाज हा व्हॅक्यूमचा असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.