Income Tax Return Online : सर्व नोकरी किंवा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या उत्पन्नासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करू शकतात. तसेच ज्यांचे उत्पन्न इन्कम टॅक्स ब्रॅकेट (Income Tax Bracket) मध्ये येत नाही असे लोक देखील आयकर रिटर्न दाखल करु शकतात. परंतु आयटीआर फाइल (File ITR) करण्यासाठी तुम्हाला आयटीआर म्हणजे काय हे देखील माहित असले पाहिजे. इन्कम टॅक्स रिटर्न हा असा फॉर्म असतो जो एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न रीपोर्ट करण्यासाठी भरला जातो.
या फॉर्ममध्ये कोणत्याही करदात्याचे उत्पन्न, खर्च, कर कपात, गुंतवणूक आणि इतर गोष्टी जाहीर केल्या जातात. ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021आहे. अंतिम मुदत जवळ आली असून करदात्यांनी या तारखेपूर्वी रिटर्न्स भरणे आवश्यक आहे. (How to file Income Tax Returns Online)
ज्या करदात्यांनी अद्याप त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरले नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ते ही प्रोसेस ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन प्रकारे करु शकतात. Income Tax विभागाकडून इन्कम टॅक्स रिटर्न इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (Income Tax Return Online) भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज आपण इंन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाइल करण्याची पध्दत सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आयकर पोर्टलवर फ्रीमध्ये ITR ऑनलाइन फाइल करू शकता.
अधिकृत इन्कम टॅक्स पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal ला भेट द्या. तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर जा आणि ई-फाइलवर क्लिक करा, त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न या ऑप्शनवर जावा आणि फाइल आयकर रिटर्नवर क्लिक करा.
2021-22 हे वर्ष असेसमेंट इयर म्हणून निवडा आणि Continue वर क्लिक करा. फाइलिंग मोड म्हणून ऑनलाइन हा निवडा आणि प्रोसिड वर क्लिक करा. एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही आधीच इन्कम टॅक्स रिटर्न भरले असेल आणि ते सबमिशनसाठी पेंडिंग असेल, तर Resume Filing वर क्लिक करा.
तुम्ही सेव्ह केलेले रिटर्न डिस्कार्ड करुन नवीन रिटर्न्स तयार करायचे असतील तर स्टार्ट न्यु फाइलिंग वर क्लिक करा, तुम्हाला लागू होणारे राज्य निवडा आणि पुढे जाण्यासाठी Continue वर क्लिक करा.
तुमच्या प्राप्तिकर रिटर्नचा प्रकार निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत: तुम्हाला कोणता ITR फाइल करायचा आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही'हेल्प मी डिसाइड विच आईटीआर फॉर्म टू फाइल' हा पर्याय निवडा आणि Continue वर क्लिक करा. जेव्हा सिस्टम तुम्हाला योग्य ITR सेट करण्यास मदत करेल, आणि तुम्ही तुमचा ITR फाइल करु शकाल.
तुम्हाला कोणता आयटीआर फाइल करायचा आहे हे माहित असल्यास 'आई नो विच आईटीआर फॉर्म आई नीड टू फाइल' हा पर्याय निवडा. ड्रॉपडाउनमधून अॅप्लिकेबव इनकम टैक्स रिटर्न निवडा आणि प्रोसिड विथ ITR वर क्लिक करा. एकदा तुम्ही तुमच्यासाठी लागू असलेला ITR निवडल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांच्या पाहा आणि लेट्स गेट स्टार्टेड वर क्लिक करा. आता तुम्हाला लागू असलेला चेकबॉक्स निवडावा लागेल आणि Continue वर क्लिक करावे लागेल.
या पुढील स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्ममध्ये प्री फील्ड डेटाचे तपासून पाहावा लागेल आणि त्यासोबत आवश्यक असल्यास ती माहिती एडीट करावी लागेल. आवश्यक असल्यास राहिलेली आणि आवश्यक माहिती तुम्हाला लिहावी लागेल. प्रत्येक सेक्शनच्या शेवटी Confirm वर क्लिक करा. तुम्हाला तुमची मिळकत आणि कपातीची माहिती वेगवेगळ्या विभागांमध्ये एंटर करावी लागेल. फॉर्मचे सर्व सेक्शन भरव्यास कंन्फर्म करा आणि प्रोसिड वर क्लिक करा.
कर भरायचा असल्यास, तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला तुमच्या टॅक्स कंप्यूटेशन समरी दाखवला जाईल. जर कंप्यूटेशनच्या आधारे टॅक्स भरायचा असेल, तर तुम्हाला पेजच्या तळाशी पे नाऊ आणि पे लेटर असे दोन पर्याय मिळतात. जर कोणताही कर भरायचा नसेल (नो डिमांड / नो रिफंड) किंवा तुम्ही रिफंडसाठी पात्र असाल तर.
टॅक्स भरल्यानंतर प्रिव्ह्यू रिटर्नवर क्लिक करा. जर कर कंप्यूटेशनच्या आधारावर कोणताही रिफंड असेल तर तुम्हाला प्रिव्ह्यू आणि सब्मिट योर रिटर्न पेजवर परत घेऊन जाईल
प्रिव्ह्यू आणि योर रिटर्न पेजवर, प्लेस एंटर करा , डिक्लेरेशन चेकबॉक्स निवडा आणि प्रोसिड टू वॅलिडेशन वर क्लिक करा. तुमचा रिटर्न तयार करताना तुम्ही टॅक्स रिटर्न प्रीपेअरर किंवा टीआरपीचा समावेश केला नसल्यास, तुम्ही टीआरपीशी संबंधित टेक्स बॉक्स रिकामा ठेवू शकता.
वॅलिडेटनंतर प्रिव्ह्यू आणि सबमिट योर रिटर्न पेजवर व्हेरिफिकेशन साठी प्रोसिडवर क्लिक कारा, यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्ममधील त्रुटी दिसतील त्यानंतर तुम्हाला त्या दुरुस्त करण्यासाठी फॉर्मवर वापस जावे लागेल, जर काही त्रुटी नसल्यास Proceed to Verify वर क्लिक करून तुमचे रिटर्न ई-व्हेरिफाय करण्यासाठी पुढे जाऊ शकता.
Complete Your Verification पेजवर, तुमच्या आवडीचा पर्याय निवडा आणि Continue वर क्लिक करा. तुमचे रिटर्न आणि ई-व्हेरिफिकेशन पडताळणे आवश्यक आहे. तुम्ही नंतरचा ई-पडताळणी पर्याय निवडल्यास, तुम्ही तुमचे रिटर्न सबमिट करू शकता.
तुम्हाला तुमचा आयटीआर भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत तुमचे रिटर्न व्हेरिफिकेशन करावे लागेल. ई-व्हेरिफिकेशन पेजवर तो पर्याय निवडा ज्याद्वारे , तुम्हाला रिटर्न ई-व्हेरिफाय करायसाठी आहे आणि Continue वर क्लिक करा.
तुम्ही ITR-V द्वारे व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडल्यास, तुम्हाला तुमच्या ITR-V ची स्वाक्षरी केलेली फिजीकल प्रत सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, बंगलोर 560500 वर नॉर्मल/स्पीड पोस्टद्वारे 120 दिवसांच्या आत पाठवावी लागेल.
आता तुम्ही बँक अकाउंट प्री वॅलिडेट केले असल्याची खात्री करुन घ्या, जेणेकरुन रीफंड तुमच्या खात्यात थेट जमा होईल. जेव्हा तुम्ही तुमचे इनकन टॅक्स फायलींद इ व्हेरिफय करता तेव्हा ट्रांजेक्शन आयडी आणि एक्नॉलेजमेंट नंबर सोबत एक सक्सेस मॅसेज दिखील दिसेल. तसेच तुम्हाला इ फायलिंग पोर्टलवर रजिस्टर्ड असलेल्या तुमच्या मोबाईल नंबर आणि इमेल आयडीवर कंफर्मेशन मेसेज देखील पाठवला जाईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.