सोशल मीडिया खरंच पूर्णपणे बंद झाला तर? कसं असणार त्यानंतरचं जग

social media
social media
Updated on

नागपूर : केंद्र सरकारनं (Government of India) काही महिन्यांआधी सोशल मीडियासंदर्भात नवे नियम (New IT rules) जाहीर केले आहेत. यामुळे युजर्सची प्रायव्हसी (privacy protection) तसंच युजर्सची सुरक्षितता भंग होणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र यातील काही मुद्द्यांवर सोशल मीडिया अप्लिकेशन्स (Social Media Applications) Google, Facebook, Instagram आणि Twitter हे समाधानी नाहीये. गेल्या काही दिवसांपासून या अप्लिकेशन्स पूर्णपणे बंद होणार की काय? अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच जोर धरून आहे. मात्र असं खरंच झालं तर? सोशल मीडिया कायमचा बंद झाला तर? आपल्याला अशी कल्पनाही करवत नाही. एक्सपर्ट्सकडून यावर मत मांडण्यात आलंय. (Know expert opinion what if social media banned in India)

social media
अवघ्या ५००० रुपयांत द्या भारतातील या टॉप पर्यटन स्थळांना भेट

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि केंद्र सरकारमधील वाद उघडपणे दिसून येतोय. गेल्या काही दिवसांत ट्विटरकडून भारतातील काही राजकारणी आणि काही महत्वाच्या व्यक्तींच्या अकाउंटवरील ब्लु टिक हटवण्यात आली होती. मात्र २४ तासात पुन्हा ही ब्लु टिक परत देण्यात आली. तसंच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यांनी नाराजीचा सूर दाखवला होता त्यानंतर यांनी केंद्र सरकारच्या नवीन आयटी नियमांना साथ देणार अशी घोषणा केली. मात्र अजूनही धुसफूस सुरूच आहे.

सोशल मीडिया पूर्णपणे झाला तर?

भारतात तब्बल ४४८ मिलियन म्हणजेच तब्बल ४५ कोटीच्या जवळपास लोकं सोशल मीडियाचा वापर करतात. अगदी आपल्या मित्रांशी बोलण्यापासून ते काही नवीन शिक्षण घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करतात. पण सोशल मीडिया अचानक एक दिवस बंद झाला तर? एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार तो जगातील सोशल मीडिया प्रेमींसाठी 'काळा दिवस' असेल. याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्याला लागलेली सवय. अगदी झोपेतून उठल्यापासून ते रात्री परत झोपतपर्यंत आपण सोशल मीडियाच्या सानिध्यात असतो. इतकंच नाही तर सोशल मीडियामुळे आपण स्वतः सोशल झालो आहोत. आपला आनंद, आपलं दुःख अशा काही गोष्टी आपण लोकांना सोशल मीडियामार्फत सांगत असतो. मात्र सोशल मीडिया बंद झाला तर लोकं बंदिस्त होतील.

सोशल मीडिया बंद झाल्यानंतर?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक युट्युबर्स आणि क्रिएटर्स यांचा उदरनिर्वाह याच सोशल मीडियाच्या भरवश्यावर चालतो. ज्यांचे जितके जास्त फॉलोअर्स त्यांनी तितके जास्त पैसे. मात्र एक दिवस सोशल मीडिया अचानक बंद झाला तर या सर्व जणांकडे उदरनिर्वाहाचं साधन नसेल.

अनेकजण सोशल मीडियाद्वारे स्वतःचे कलागुण संपूर्ण जगासमोर सादर करतात. अनेकजण अशा लोकांना फॉलो करून त्यांना प्रोत्साहित करतात. मात्र सोशल मीडिया बंद झाला तर अशा स्मार्ट क्रिएटर्सना स्वतःचे कलागुण सादर करण्याची संधी मिळू शकणार नाही.

दूरच्या देशातील आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना आपण एका क्लिकवर बघू शकतो, त्यांच्याशी वाटेल त्यावेळी संवाद साधू शकतो. हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शक्य होतं. मात्र सोशल मीडिया बंद झाला तर आपल्याला प्रत्यक्ष जाऊन भेटण्याशिवाय दुसरा उपाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला भेटण्यातील अंतरही वाढेल.

सोशल मीडियातून आपल्याला अनेकांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती मिळत असते. कोण काय करतंय, कुठे जातंय याबद्दल आपण अवगत असतो. मात्र सोशल मीडिया बंद झाला तर आपल्याला कोणाशीच संवाद साधता येणार नाही. तसंच कोणाच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेऊ शकणार नाही.

शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोशल मीडिया बंद झाल्यास सर्वाधिक फटका बसेल. नोट्स असो की पुस्तक असो सोशल मीडियावरुनच शेअरिंग होते. तसंच काही ग्रुप्स असल्यामुळे महत्वाचे मसेज एकाचवेळी अनेकांना जातात. मात्र सोशल मीडिया बंद झाला तर शिक्षणात अडचणी येऊ शकतात.

एकूणच काय तर सोशल मीडिया बंद झाल्यास अशा एक ना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसंच नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो असं एक्सपर्ट सांगतात. मात्र सोशल मीडिया बंद होण्याचा फायदाही आहे. सोशल मीडिया बंद झाल्यामुळे लोकांमधील प्रत्यक्ष भेटीगाठी वाढतील, कुटुंबासह वेळ घालवता येईल, आपले सुख-दुःख इतरांना प्रत्यक्ष सांगता येतील.

social media
बापरे! 'या' वर्षापर्यंत पृथ्वीवरील पाण्याचा साठा पूर्णपणे होणार नष्ट

घाबरू नका. सोशल मीडिया बंद होणं हे इतकं सोपं नाही किंबहुना संपूर्ण सोशल मीडिया कधीच बंद होणार नाही. कारण हे संवादाचं एक प्रमुख साधन आहे.

(Know expert opinion what if social media banned in India)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()