आज तुमच्यापैकी बहुतेकजण Gmail वापरत असतील. बरेच लोक Gmail खाते फक्त मेलिंगसाठी वापरतात, परंतु Google Drive आणि Google Docs च्या वापराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. व्हॉइस टायपिंग, क्लियर फॉरमॅटिंग, कमेंटमध्ये एखाद्याला टॅग करणे यासारख्या Google डॉक्सच्या शक्तिशाली फीचर्स बद्दल तुमच्यापैकी फक्त काही लोकांनाच माहिती असेल. आज आपण Google डॉक्सच्या काही भन्नट फीचर्सबद्दल जाणून धेणार आहोत, ज्या जाणून घेतल्यास तुमचे बरेच काम सोपे होईल.
ऑफलाइन मोड
Google डॉक्समध्ये काम करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन असणे आवश्यक नाही. तुम्ही गुगल डॉक्समध्ये ऑफलाइनही काम करू शकता. गुगल ड्राइव्हच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही ऑफलाइन मोड चालू करू शकता. गुगल डॉक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कंटेंट पुन्हा पुन्हा सेव्ह करावा लागत नाही. डॉक्यूमेंट्समध्ये कंटेट आपोआप सेव्ह केला जातो.
व्हाईस टायपिंग
तुम्हाला टायपिंगचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही हिंदी-इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये बोलून टाइप करू शकता . यासाठी जीमेलमध्ये लॉगिन करून उजव्या बाजूला प्रोफाईल फोटोच्या शेजारी असलेल्या डॉट मेन्यूवर क्लिक करा, गुगल ड्राइव्ह उघडा आणि नंतर वरच्या डाव्या बाजूला दाखवलेल्या New वर क्लिक करून Google डॉक्स उघडा. आता डॉक्सच्या टॉपला दिसणार्या बारमधील टूल्सवर क्लिक करा. तेथे तुम्हाला व्हॉईस टायपिंगचा पर्याय मिळेल. आता व्हॉइस टायपिंग वर क्लिक करा, तुमची भाषा निवडा आणि बोला. मात्र, हे टूल फक्त गुगल क्रोम ब्राउझरमध्येच काम करेल.
क्लिअर फॉरमॅटिंग
अनेक वेळा आम्ही दुसर्या साइटवरील कंटेट कॉपी करतो आणि Google डॉक्समध्ये पेस्ट करतो. अशा वेळी, त्या वेबसाइटच्या फॉरमॅटिंगमध्येच डॉक्समध्ये देखील कंटेंट पेस्ट होतो. अशा वेळी तुम्हाला कंटेंट एडिट करताना अडचण येऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण कंटेंट निवडून, मेनू बारमधील फॉरमॅटवर जा आणि क्लिअर फॉरमॅटिंग करा किंवा डॉक्सच्या टॉपला उजव्या बाजूला दाखवलेल्या Tx वर क्लिक करा.
फोटो हव्या त्या आकारात तयार करा
तुम्हाला हवे असल्यास, आपण कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये मजकूरासह हवे त्या आकाराचा फोटो टाकू शकता. यासाठी गरज असल्यास तो डाउनलोड देखील करू शकता.
एखाद्याला कंमेंटमध्ये टॅग करा
Microsoft Word प्रमाणे, तुम्ही Google Docs मध्ये टायपिंग आणि लेटर टाईप देखील करू शकता. जर तुम्ही कोणतेही डॉक्स एडिट करत असाल आणि त्यात काही चूक असेल किंवा कोणतीही सूचना घ्यायची असेल तर तुम्हाला ज्या वाक्यातून सूचना घ्यायची/ दाखवायची आहे ते वाक्य निवडून तुम्ही ते टॅग करू शकता. तुम्ही ज्याला टॅग कराल त्यांना एक ई-मेल पाठवला जाईल आणि तुम्ही कंमेंटमध्ये काय लिहिले आहे ते देखील दिसेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.