तुम्हीसुद्धा टेलिकॉम कंपन्यांच्या सततच्या कॉल्समुळे त्रस्त आहात? मग असं ॲक्टिव्हेट करा DND 

dnd
dnd
Updated on

नागपूर : मोबाईलशिवाय जगण्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ आपल्याजवळ मोबाईल असतोच. मात्र अनेकांच्या मोबाईलवर सात टेलिकॉम कंपन्यांचे कॉल्स येत असतात. त्यामुळे सर्वच त्रस्त असतात. कधी कुठली ऑफर सांगण्यासाठी तर कधी रिचार्ज  करा हे सांगण्यासाठी कंपन्यांचा फोन येत असतो. मात्र तुम्हाला DND बद्दल माहिती आहे का? DND म्हणजे Do Not Disturb. ही सुविधा तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर कधीच कुठल्या कंपनीचे कॉल्स येणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला हे DND निरनिराळ्या कंपनीच्या सिमकार्डमध्ये कसं ॲक्टिव्हेट करायचं याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. 

जर तुम्ही जियो (Jio), एयरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया  (Vi) किंवा बीएसएनएल (BSNL) या टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला DND ॲक्टिव्हेट करता येईल. 

एयरटेलमध्ये असं ॲक्टिव्हेट करा DND

  • यासाठी आधी एयरटेलची वेबसाईट ओपन करा. 
  • यानंतर एयरटेल मोबाईल सर्विस बटणवर क्लिक करा. 
  • यानंतर तुम्हाला एक पॉपअप बॉक्स दिसेल. यात आपला फोन नम्बर टाईप करा. 
  • यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक OTP मिळेल. हा OTP वेबसाईटवर पेस्ट करा. 
  • यानंतर STOP All नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
  • अशा पद्धतीनं DND ॲक्टिव्हेट होईल.

BSNL आणि MTNL मध्ये DND

  • यासाठी सुरुवातीला START 0 असा मेसेज टाईप करून 1909 वर सेंड करा. 
  • यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये DND सर्व्हिस ॲक्टिव्हेट होईल. 
  • 1909 वर कॉल करूनही तुम्ही DND सर्व्हिस ॲक्टिव्हेट करू शकता. 

वोडाफोन-आयडियामध्ये असं ॲक्टिव्हेट करा DND

  • यासाठी वोडाफोन-आयडियाची वेबसाईट ओपन करा.
  • यांनतर DND या पर्यायावर क्लिक करा. 
  • इथे तुमचा नाव, नंबर, ई-मेल आयडी ही सर्व माहहती टाईप करा. 
  • यानंतर DND साठी YES वर क्लिक करा. 
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. 
  • OTP देऊन submit वर क्लिक करा. यानंतर तुमच्या फोनमध्ये DND ॲक्टिव्हेट होईल.

रिलायंस जियोमध्ये असं ॲक्टिव्हेट करा DND

  • यासाठी सुरुवातीला MY JIO App डाउनलोड करा. त्यानंतर लॉग इन करा. 
  • यानंतर उजव्या हाताला दिसणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून सेटिंग्समध्ये जा. 
  • तिथे DND सर्व्हिस दिसेल तिथे क्लिक करा. 
  • यानंतर तुम्हाला मसेज येईल ज्याप्रमाणे तुमची DND सर्व्हिस ७ दिवसांच्या आतमध्ये ॲक्टिव्हेट होईल.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()