Sim Card: तुमचे नाव वापरून किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? 'या' सोप्या ट्रिकने घ्या जाणून

एका आधार कार्डवर केवळ ९ मोबाइल नंबर रजिस्टर्ड असतात. परंतु, तुमच्या ओळखपत्राचा वापर करून कोणीही नवीन सिम कार्ड घेऊ शकते.
Sim Cards
Sim CardsSakal
Updated on

SIM cards registered under your Aadhaar Card: नवीन सिम कार्ड घ्यायचे असल्यास पुरावा म्हणून ओळखपत्र द्यावे लागते. आपण अनेकदा ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करतो. परंतु, तुमचे आधार कार्ड वापरून इतर व्यक्तीने सिम कार्ड तर घेतलेले नाही ना? अनेकदा आपल्या नावाने कोण सिम कार्ड वापरत आहे, याची आपल्याला माहितीच नसते. एका आधार कार्डवर केवळ ९ मोबाइल नंबर रजिस्टर असतात.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

सिम कार्डचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. तुमच्या नावावर रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरचा वापर करून चुकीचे काम केले जाऊ शकते. त्यामुळे आधार कार्डची फोटो कॉपी अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे. तुम्हाला देखील तुमच्या नावावर किती सिम कार्ड वापरले जात आहेत, हे जाणून घ्यायची एक सोपी प्रोसेस उपलब्ध आहे. यासाठी सरकारने खास वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: McLaren 765LT: देशातील सर्वात महागडी कार खरेदी करणारा नसीर खान नक्की करतो काय? जाणून घ्या

या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

  • सर्वात प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाइटवर जा.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल.

  • आता तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी व्हेरिफाय करा.

  • येथे तुमच्या नावावर रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरची लिस्ट दिसेल. तुम्ही जर एखादा नंबर वापरत नसल्यास रिपोर्ट देखील सबमिट करू शकता.

  • Action बटनवर क्लिक केल्यास तुम्हाला This is not my number, Not required, Required हे पर्याय दिसतील. यातील This is not my number वर क्लिक करून रिपोर्ट करा.

  • मात्र, लक्षात घ्या की ही सेवा सध्या केवळ आंध्र प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगाना, जम्मू-काश्मिर, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. लवकरच इतर राज्यातील नागरिक देखील या वेबसाइटचा वापर करू शकतील.

Sim Cards
Smartphone Offer: Flipkart चा धमाकेदार सेल सुरू, निम्म्या किंमतीत मिळतायत ब्रँडेड स्मार्टफोन्स; ऑफर एकदा पाहाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.