बऱ्याचदा ऑफीसमध्ये काम करत असताना आपल्याला काही अडचणीचा सामना करावा लागतो, जसे की PDF फायलमध्ये असलेल्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी चूक होते आणि ती एडीट करता येत नाही. तसेच कॉपी-पेस्ट करताना देखील अडचणी येते. अशा परिस्थितीत लोकांना पीडीएफ फाइल टाईप करावी लागते. चांगली गोष्ट ही आहे की ही समस्या सोप्या पध्दतीने सोडवता येते. जर तुम्हाला पीडीएफ एडीट करायचे असेल तर ते काही सोप्या मार्गांनी word फाईलमध्ये ती कन्व्हर्ट करून एडीट केली जाऊ शकते. आज आपण याची सोपी पध्दत जाणून घेणार आहोत.
बऱ्याचदा ऑफीशीयल किंवा अन्य कामाच्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल स्वरूपात पाठवली जातात. त्याचे फायदे अनेक आहेत. जसे की अशा फाइली ऑनलाईन अपलोड आणि डाउनलोड करणे सोपे जाते.
PDF फाइल Word मध्ये कशी कनव्हर्ट कराल?
सर्वप्रथम http://www.hipdf.com वेबसाइटवर क्लिक करा.
येथे तुम्हाला अनेक पर्याय दिलेले असतील. यातून तुम्हाला PDF to Word ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर फाइल निवडा या ऑप्शनवर क्लिक करून पीडीएफ फाइल अपलोड करा.
फाइल अपलोड केल्यानंतर, 'कन्व्हर्ट' बटणावर टॅप करा.
अशा प्रकारे तुमची PDF फाईल Wordमध्ये कन्व्हर्ट होईल, जी डाउनलोड केली जाऊ शकते.
यानंतर तुम्ही कन्व्हर्ट फाइलमध्ये तुम्हाला हवेत ते बदल करू शकाल.
PDF ला Word मध्ये ऑफलाइन कन्व्हर्ट कराल?
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या सिस्टमवर Wonder share PDF element सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल करावे लागेल.
सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा. त्यानंतर तुम्हाला कन्व्हर्ट करायची असलेली PDF फाइल निवडा.
आता या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमची PDF फाईल वर्ड डॉक्युमेंटमध्ये कन्व्हर्ट होईल.
त्यानंतर तुम्ही या फाइलमध्ये कोणतेही बदल करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.