5G On iPhone: Apple चे नवीन अपडेट, आता आयफोन यूजर्स वापरू शकतात 5G

अ‍ॅपलने आयफोन मॉडेलसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटमुळे आयफोन यूजर्सला आता ५जी वापरणे शक्य होईल.
iPhone
iPhoneSakal
Updated on

How to Activate 5G On iPhone: भारतात ५जी नेटवर्क सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि जिओ यांनी प्रमुख शहरांमध्ये ५जी सेवा सुरू केली आहे. परंतु, अद्याप अनेक प्रीमियम स्मार्टफोन्स यूजर्सला ५जी सर्व्हिसचा फायदा घेता येत नाहीये. आयफोन यूजर्सला देखील ५जी सर्व्हिस वापरता येत नव्हती. परंतु, आता Apple ने नवीन अपडेट जारी केले आहे. Apple ने भारतात आयफोन्ससाठी ५जी अपडेट जारी केले आहे.

हेही वाचा: Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

Apple ने बीटा यूजर्स आणि डेव्हलपर्ससाठी iOS १६.२ RC अपडेट रिलीज केले आहे. या महिनाखेर सर्व यूजर्ससाठी हे रोलआउट जारी केले जाईल. या अपडेटमध्ये Apple चे Freeform अ‍ॅप, नवीन HomeKit आर्किटेक्चर आणि Apple Music Sing karaoke फीचरचा समावेश आहे. तसेच, अपडेटमुळे भारतातील आयफोन मॉडेल्सवर ५जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करता येईल.

आयफोन यूजर्स iOS 16.2 ला अपडेट केल्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन ५जी इनेबल करू शकतात. ५जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करण्यासाठी त्या भागामध्ये ५जी सर्व्हिस उपलब्ध असणे गरजेचे आहे. सध्या जिओ आणि एअरटेलने प्रमुख शहरांमध्ये ५जी सेवा सुरू केली आहे. ५जी वापरण्यासाठी तुमच्याकडे iPhone 12, iPhone 13, iPhone 14 आणि iPhone SE 3 असणे गरजेचे आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन यूजर्स या अपडेटची वाट पाहत होते. आता नवीन अपडेटमुळे यूजर्स सहज ५जी सर्व्हिसचा फायदा उचलू शकतात.

iPhone
iPhone Offer: आतापर्यंतची सर्वात बंपर ऑफर! खूपच स्वस्तात मिळतेय iPhone चे लेटेस्ट मॉडेल; जाणून घ्या डिटेल्स

iPhone अशा पद्धतीने सुरू करा 5G

  • यासाठी सर्वात प्रथम बीटा प्रोग्राममध्ये सहभागी होऊन iOS 16 ला अपडेट करावे लागेल.

  • त्यानंतर आयफोन सेटिंग्समध्ये जा.

  • येथे तुम्हाला ‘Cellular’ चा पर्याय दिसेल.

  • आता ‘Cellular Data Options’ वर क्लिक करा.

  • पुढे ‘Voice & Data’ वर जा. येथे ‘5G Auto’ आणि ‘5G On’ चा पर्याय दिसेल.

  • ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या भागात ५जी सेवा उपलब्ध असल्यास तुम्ही सहज याचा फायदा घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.