अँड्रॉइड फोनमध्ये फास्ट चार्जिंग होत नाहीये? फॉलो करा या टिप्स

fast charging of mobile
fast charging of mobile
Updated on

सध्या स्मार्टफोनचा वापर खूपच जास्त प्रमाणात वाढला आहे त्यामुळे फोनची चार्जींग देखील तितक्याच वेगाने संपते. पण कालांतराने स्मार्टफोन मध्ये तंत्रज्ञान इतके विकसित झाले की आता आपले स्मार्टफोन कमी वेळेत फास्ट चार्ज होतात. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक बॅटरी बॅकअप मिळते मात्र, आता अनेक यूजर्सना स्मार्टफोन फास्ट चार्जिंग करण्यात अडचणी येत आहेत. आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग व्यवस्थित करु शकाल.

फोन अपडेट करा आणि स्विच ऑफ करुन चार्ज करा

तुमचा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो, पण जर त्यात फास्ट चार्जिंग नीट काम करत नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन अपडेट करा. यामुळे सिस्टममधील बग्ज दूर होतील आणि फोन फास्ट चार्ज होण्यास सुरुवात होईल. याशिवाय तुम्ही फोन स्विच ऑफ करूनही चार्ज करू शकता. असे केल्याने फोन फास्ट चार्ज होईल.

fast charging of mobile
पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

सेव्ह मोडमध्ये जाऊन तुमचा फोन ट्रबलशूट करा

सेव्ह मोड हे अॅप्लिकेशन कॉन्फिगरेशन किंवा त्यासंबंधित समस्यांचे सोडवण्यासाठी Android फोनमध्ये देण्यात आले आहे. तुमचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमचे डिव्हाइस सेव्ह मोडमध्ये रीस्टार्ट करू शकता.

डेटा केबल चेक करा

फोन फास्ट चार्ज करण्यासाठी, डेटा केबल चार्जरइतकीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही फास्ट चार्जिंग चार्जर आणि नॉन-फास्ट चार्जिंग डेटा केबल वापरत असाल तर यामुळे तुमचा फोन फास्ट चार्ज होणार नाही. फोन जलद चार्ज करण्यासाठी नेहमी फास्ट चार्जर आणि सर्टिफाईड डेटा केबल वापरा. असे केल्याने तुमचा फोन फास्ट चार्ज होईल.

fast charging of mobile
Maruti Baleno लवकरच येतेय नव्या अवतारात; काय असतील फीचर्स?

चार्जिंग पोर्ट तपासा

खराब झालेल्या चार्जिंग पोर्टमुळे फोनच्या चार्जिंगवरही परिणाम होतो. एवढेच नाही तर फोनच्या बॅटरीवरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुमचा फोन फास्ट चार्ज होत नसेल तर सर्वप्रथम चार्जिंग पोर्ट तपासा. पोर्ट खराब असल्यास ते दुरुस्त करून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.