Eamil Tips : आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात कोट्यवधी लोक ईमेलचा वापार करतात. अनेक गोष्टींसाठी,लॉगिन साठी ईमेलची आवश्यकता असतेच. अश्यात आपण जीमेल खाते सुरू करतो. त्यावर आपल्याला अनेक मेल येत असतात. पण तुम्ही विचार केला आहे काय जर तुम्ही तुमचं ईमेल तुमच्या मातृभाषेत किंवा अन्य कोणत्याही आवडत्या भाषेत भाषांतरित करू शकलात तर ? तर आता ते शक्य झाले आहे.
आता तुम्ही जीमेल अॅपवर थेट तुमच्या ईमेलचे भाषांतर करू शकता. मित्र, नातेवाईक किंवा सहकाऱ्यांकडून परदेशातून आलेल्या ईमेल आता वाचणे सोपे होणार आहे.पण बहुतांश लोकांना हे माहिती नसत की हे भाषांतर करायच कस तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अगदी सोप्या स्टेप्स मध्ये तुम्ही कश्या प्रकारे कोणतेही ईमेल हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता.
सर्वप्रथम जीमेल अॅप उघडा आणि तुम्ही ज्या ईमेलचे भाषांतर करू इच्छिता ते निवडा. नंतर ईमेल उघडल्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदूंवर टॅप करा.
तीन बिंदूंवर टॅप केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी "Translate" (भाषांतर) या पर्यायावर टॅप करा.
"Translate" या पर्यायावर टॅप केल्यानंतर तुम्हाला ज्या भाषेत ईमेल वाचायचे आहे त्या भाषेचा पर्याय निवडा. झटपट तुमच्यासमोर ईमेल निवडलेल्या भाषेत अनुवादित होऊन दिसेल.
काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. भाषांतर सुविधा सध्या चाचणी टप्प्यात आहे. त्यामुळे कधी कधी अनुवादित मजकुर व्याकरणीक पूर्णपणे अचूक नसतील. तांत्रिक किंवा कायदेशीर दस्तावेजांसाठी ज्यांना अत्यंत शुद्ध भाषेची गरज असते अशा ईमेलसाठी हा अनुवाद पूर्णपणे अचूक नसेल.
या फीचारमध्ये एका वेळी फक्त एका ईमेलचे भाषांतर करता येते. ही सुविधा हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. तुमच्या अॅपवर अजून दिसत नसल्यास अॅप अपडेट करा. आता भाषेच्या अडथळ्याशिवाय जगभरात तुमच्या मित्रांशी संवाद साधू शकणार आहात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.