कार मेन्टेनन्ससाठी फॉलो करा या टिप्स; खर्चात बचतीसह वाढेल मायलेज

Car Maintenance Tips
Car Maintenance Tipsgoogle
Updated on

कार चालवण्यासाठी जसे त्यामध्ये इंधन असणे जेवढे आवश्यक आहे, तितकेच कारची देखभाल करणेही महत्त्वाचे आहे. गाडीची योग्य देखभाल केली नाही तर तुमची कार कुठेही फसगत करू शकते. एवढेच नाही तर तुमचा खर्चही वाढतो. म्हणूनच आज आपण अशाच काही महत्त्वाच्या मेंटेनन्स टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे कारचे मायलेज तर वाढेलच पण इंजिनही फिट राहिल.

1. कार मॅन्युअल वाचा

प्रत्येक कारसोबत त्या कारचे युजर मॅन्युअल दिलेले असते प्रत्येकाने ते वाचलेच पाहिजे, हे एक महत्त्वाचे दस्तऐवज असते. यामध्ये आपल्या कारसाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यात लिहिलेली असते. यामध्ये कारच्या स्पेसिफिकेशनपासून ते सेफ्टी फीचर्सपर्यंत सर्व टिप्स लिहिलेल्या असतात. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारमधील किरकोळ गोष्टी सहज दुरुस्त करू शकता.

2. कारचे टायर प्रेशर तपासा

आता येणाऱ्या नवीन कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देण्यात येत आहे, जी टायरमध्ये कमी हवा असल्यास तुम्हाला वॉर्निंग देते. मात्र, तुमच्या वाहनात ते नसेल, तर तुम्ही वेळोवेळी वाहनाच्या टायरचे प्रेशर तपासले पाहिजे. ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाजावर कोणत्या टायरमध्ये हवा किती असावी असे लिहिलेले असते. टायरमध्ये योग्य हवा असताना तुम्हाला चांगले मायलेजही मिळते.

Car Maintenance Tips
या वर्षात भारतातील 'हे' ॲप्स ठरले बेस्ट; पाहा संपूर्ण यादी

3. कारचे इंजिन स्वच्छ ठेवा

कारच्या इंजिनमध्ये काही समस्या आल्यास कार नीट चालणार नाही. म्हणूनच कारचे इंजिन नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कारमध्ये नेहमी स्वच्छ इंधन भरा आणि वेळोवेळी इंजनची स्वच्छता करत रहा. तेल कोठूनही गळत नाही ना हे देखील तपासा. तसे होत असेल तर हे एका मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते.

4. ब्रेक फ्लुइड, लूब्रीकेंट आणि ऑईल फिल्टरची काळजी घ्या

वाहनाच्या ब्रेकची काळजी घ्या , त्यासाठी ब्रेक फ्लुइड आवश्यक असते. तुम्ही युजर मॅन्युअलमधून ब्रेक फ्लुइडची योग्य पातळी शोधू शकता. जेव्हा जेव्हा त्याचा रंग गडद होऊ लागतो तेव्हा तो बदलण्याची वेळ आलेली असते. याशिवाय लूब्रीकेंट आणि ऑईल फिल्टरचीही काळजी घ्या. तुमची कार लूब्रीकेंटच्या मदतीने सुरळीतपणे काम करते. तुमच्या कारमध्ये ऑईल फिल्टर असते जे ऑईल दूषित होण्यापासून वाचवते आणि ते स्वच्छ ठेवते.

Car Maintenance Tips
बजेटमध्ये बसणारी इलेक्ट्रिक बाइक शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

5. चांगल्या मायलेजसाठी..

कारमधून चांगले मायलेज हवे असेल तर तुम्ही तुमची कार चांगल्या कंडीशनमध्ये ठेवून आणि योग्यरित्या चालवणे गरजेचे असते. तुम्ही रॅश ड्रायव्हिंग किंवा वारंवार स्पीड कमी-जास्त करणे टाळले पाहिजे कारण याचा मायलेजवर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमच्या कारमध्ये जड वस्तू घेऊन जाणे टाळा कारण यामुळे कारचे मायलेज पुन्हा कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.