इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला या दिवसात एक नवीन अपडेट मिळाले आहे, यामुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. व्हाट्सएप वापरकर्त्यांचा रंग बदलण्याचा दावा करणाऱ्या गुलाबी अपडेट लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी वापरकर्त्यांना दिला आहे. खरं तर आजकाल व्हॉट्सअॅप यूजर्सना गुलाबी अपडेट येत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की या अपडेटनंतर व्हॉट्सअॅपचा रंग पिंक करता येईल. तसेच, या अपडेटमध्ये काही नवीन फीचर्स देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
तज्ञांनी दिली चेतावणी
सायबर सिक्युरिटी एक्सपर्टच्या दाव्यानुसा व्हाट्सएप पिंक अपडेटच्या लिंकवर दावा केला जात आहे की हे व्हॉट्सअॅपचे अधिकृत अपडेट आहे. पण हॅकर्सकडून फसवणूक सुरू आहे. व्हाट्सएप पिंक अपडेटनंतर वापरकर्त्यांनी त्यांच्या अकाउंटवरील नियंत्रण राहात नाही. म्हणजे त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होते. तसेच बर्याच वेळा हॅकर्स व्हॉट्सअॅप पिंक अपडेटच्या मदतीने मोबाईल फोन हॅक देखील करतात. यामुळे ग्राहकांसोबत फसवणूकीची शक्यता निर्माण होते.
अज्ञात APP किंवा लिंक्स इंस्टॉल करू नका
व्हाट्सएप वापरकर्त्यांनी व्हाट्सएप पिंकबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याची माहिती सायबर तज्ञ देत आहेत. हा व्हायरस व्हाट्सएप ग्रुपमध्ये एपीके डाउनलोड लिंकच्या मदतीने पसरवला जात आहे. हे #WhatappPink च्या नावाने इंजेक्ट केले जात आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी #WhatappPink कडून येणार्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये अन्यथा आपण आपल्या स्मार्टफोनवरील कंट्रोल पूर्णपणे गमावाल. अलीकडेच ही धोकादायक लिंक अनेक व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी शेअर केली आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये गुलाबीसह गोल्ड अपडेट
सायबर इंटेलिजेंस कंपनी व्हॉयेजर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन म्हणाले की, वापरकर्त्यांना एपीके आणि मोबाइल अॅप इंस्टॉल करू नका. वापरकर्त्यांनी नेहमीच अधिकृत प्ले स्टोअर वरून अॅप डाउनलोड करावे. हे धोकादायक अॅप आपल्या फोनवरून महत्वाची माहिती चोरू शकतो. यात आपली वैयक्तिक माहिती जसे की फोटो, एसएमएस आणि संपर्क यांचा त्या माहितीमध्ये समावेश आहे. याशिवाय बॅकिंग पासवर्डही चोरीला जाऊ शकतो. सध्या पिंक व्हॉट्सअॅपबरोबर व्हाट्सएप गोल्डचा लिंकही देण्यात आला आहेत. व्हॉट्सअॅपच्या वतीने असे म्हटले आहे की व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी अशा फसवणूकीच्या लिंकपासून सावध राहिले पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.