दिवळीच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन कार खरेदी करतात. दिवाळीच धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन कारची डिलिव्हरी मिळणे बरेच लोक शुभ मानतात. पण या काळात अनेक लोक एकाच वेळी वाहन खरेदी करत असतात आणि कंपनीकडून शेकडो वाहने डिलीव्हर केली जातात. त्यामुळे या गोंधळात बऱ्याच कारमधील काही त्रुटी लक्षात येत नाहीत. कारची डिलिव्हरी घेताना काही चूका केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज आपण ग्राहकांनी डिलीव्हरीपूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहीजे कोणत्या गोष्टी तपासल्या पाहीजेत याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
कारची पूर्ण बॉडी चेक करा
तुम्ही निवडलेली कार ज्याची डिलीव्हरी तुम्हाला मिळणार आहे ती संपुर्णपणे तपासून घेणे गरजेचे आहे. कारच्या बाहेरील बाजूवर कुठेले डाग किंवा ओरखाडे नाहीत याची खात्री करुन घ्या, कारण बऱ्याचदा असे दिसून येते की कारवर काही स्क्रॅच असतात किंवा गाडी बाहेर काढताना डीलरशिपमध्ये योग्य देखभाल न केल्याने वाहनाचे काही पार्ट डॅमेज झालेले असू शकतात. म्हणूनच कारची डिलिव्हरी घेताना कार नीट तपासणे खूप महत्वाचे आहे.
एसी आणि इंजिनची टेस्ट करा
कारची डिलिव्हरी घेताना खार सुरु करुन पाहा, जर तुम्हाला काही वेगळा आवाज ऐकू येत असेल तर लगेच त्याबद्दल तक्रार करा. या व्यतिरिक्त, एक्झॉस्टमधून बाहेर पडणारा काळा धूर देखील तपासायला विसरू नका. यासोबतच गाडीतील एसी नीट काम करत आहे की नाही हे पाहणे खूप महत्वाचे आहे. कधीकधी डीलर्स अशा लहान-सहान गोष्टी लपवून धूळ फेकतात. त्यामुळे कारमध्ये अशा गोष्टी नक्की टेस्ट करा.
इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स तपासा
नवीन कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी, कारमध्ये दिलेले सर्व स्विच निट काम करत आहेत रा तपासावेत. तसेच, हे लक्षात ठेवा की कारची सीट योग्य असावी आणि त्यावर कोणतेही डाग नसावेत. तसेच कार्पेट आणि त्याची खालची बाजू देखील तपासून पाहा. या व्यतिरिक्त, कारचे दरवाजे हँडल देखील तपासा की, दरवाजे उघडताना आणि बंद करताना काही अडचण येत नसल्याची खात्री करुन घ्या
कागदपत्रे नीट तपासा
कार नीट तपासल्यानंतर सर्व कागद काळजीपूर्वक वाचा. आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की डीलरद्वारे पेमेंट, पर्मानेंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इंश्योरंन्स पेपर, मॅन्युअल्स, वॉरंटी कार्ड, रोडसाईड असिस्टंट नंबर आणि सर्व्हिस बुक सारखी महत्वाची कागदपत्रे दिली आहेत का याची खात्री करुन घ्या. या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमची आवडती कार घरी घेऊन जाऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.