नागपूर: स्मार्टफोन म्हणजे जणू काही आपलं दुसरं जग झालंय.. एकवेळी आपण पुस्तकांशिवाय जगू मात्र स्मार्टफोनशिवाय नाही. मात्र जितका स्मार्टफोनचा वापर आपण आपल्या सोयीसाठी करतो. तितकाच गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं स्मार्टफोनचा उपयोग वाईट कामांसाठी करतात. आजकाल फोन हॅकिंगचं प्रमाण वाढतच चाललं आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या आपल्या काही खासगी गोष्टी किंवा खासगी माहिती कोणीही अगदी हॅक करू शकतात. त्यामुळे आपल्या सतर्क राहण्याची गरज असते. मात्र आपला फोन हॅक करण्यात आला आहे हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमचा फोन सुरक्षित ठेवण्याच्या काही टिप्स देणार आहोत.
*#21#
वरील दिलेला कोड आपल्या स्मार्टफोनमध्ये डायल करा आणि कॉलची बटन दाबा. यामुळे तुम्हाला तुमचे कॉल कुठल्या दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड तर होत नाहीत ना याबद्दल माहिती मिळेल. इतकंच नाही तर तुमचा कोणता कॉल फॉरवर्ड होतोय तसंच किती नंबरवर फॉरवर्ड होतोय हे यामुळे आपल्याला कळणार आहे. हॅकर्स तुम्हाला येणारे कॉल्स मुद्दाम त्यांच्या नंबरवर फॉरवर्ड करतात. तसंच तुमच्यावर नजर ठेवण्यासाठीही हॅकर्सकडून याचा उपयोग होऊ शकतो. मात्र या कोडद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर असल्यास हे माहिती करून घेऊ शकता,
*#62#
जर तुमच्या फोन कुठल्या दुसऱ्या ठिकाणी फॉरवर्ड होत असेल तर या कोडद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता. यासाठी वरील कोड तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवरून डायल करायचा आहे, तसंच जर तुमच्या स्मार्टफोनच्या सेन्सॉरद्वारे तुम्हाला कोणी ट्रॅक करत असेल तर या कोडद्वारे तुम्हाला हे ही माहिती होऊ शकणार आहे
##002#
जर तुम्हाला तुमच्या फोनमधून सर्व प्रकारची रिडायरेक्टिंग बंद करायची असेल वरील दिलेला कोड आपल्या मोबाईलमध्ये डायल करा. जर तुम्ही रोमींगमध्ये जाणार असाल किंवा आंतरराष्ट्रीय कॉल्स करणार असाल तर तुम्ही या कोडद्वारे सर्व फॉरवर्ड होणारे कॉल्स बंद करू शकता.
*#06#
ये भी एक यूनिवर्सल कोड है जो फोन का IMEI (International Mobile Equipment Identifier) नंबर जानने के लिए इस्तेमाल किया जाता है। ये नंबर बहुत काम का है और अगर फोन खो जाए तो FIR से लेकर फोन सर्चिंग एप्स तक इसी नंबर का इस्तेमाल किया जा सकता है। हालांकि, इसे किसी के साथ शेयर करना अच्छा नहीं होगा। अगर फोन खो गया है और वो स्विच ऑन होता है तो उसकी लोकेशन अपने आप नेटवर्क ऑपरेटर तक पहुंच जाएगी। अगर किसी को आपका IMEI नंबर पता होता है तो वो आपके फोन का मॉडल उसकी तकनीकी स्पेसिफिकेशन सब कुछ पता कर लेगा।
*#06#
हा नंबर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डायल करून आपल्या स्मार्टफोनचा IMEI नंबर माहिती करून घेऊ शकता. जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही या नंबरच्या मदतीनं तुम्ही आपला मोबाईल शोधू शकता किंवा ट्रॅक करू शकता.
अशा पद्धतीनं ठेवा तुमचा स्मार्टफोन सुरक्षित
अँटीव्हायरस अपडेटेड ठेवा
तुम्ही कुठल्याही कंपनीचा स्मार्टफोन वापरत असाल तर तुच्या फोनमधील अँटीव्हायरस अपडेटेड ठेवायला विसरू नका. तसंच जर अँटीव्हायरस जुना असेल तर त्याला नवीन व्हर्जनमध्ये विकत घ्या. ज्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस शिरणार नाही आणि तुमचा मोबाईल सुरक्षित राहील.
जाहिरातींच्या माध्यमातून होणारी ट्रॅकिंग अशी करा बंद
अनेकदा तुम्ही स्मार्टफोनवर इंटरनेट वापरत असताना जाहिराती येतात. आपण जाहिराती बंद करू शकत नाही. मात्र या जाहिरातींच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलची ट्रॅकिंग होऊ शकते. ही ट्रॅकिंग थांवण्यासाठी आम्ही आज टिप्स देणार आहोत.
आयफोन IOSसाठी :
Settings >> Privacy >> Advertising >> Limit Ad Tracking
आयफोनमध्ये जाहिरातींद्वारे ट्रॅकिंग बंद करायची असेल तर सेटीन्ग्स ओपन करा. त्यानंतर प्रायव्हसीमध्ये जा. तिथे Advertising मध्ये जाऊन Limit Ad Trackingमध्ये जा यामुळे सर्व जाहिरातींच्या कोडला अनलिंक करू शकता.
अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी :
Settings >> Google >> Ads >> Opt out of ads personalization
यासाठी सेटिंगमध्ये जाऊन गूगल ओपन करा. यानंतर adsमध्ये जाऊन Opt out of ads personalization सिलेक्ट करा आणि ट्रॅकिंग बंद करू शकता.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.