मोबाईलचं पॅटर्न लॉक विसरलात का? मग घाबरता कशाला? या आहेत अनलॉक करण्याच्या सोप्या टिप्स 

pattern
pattern
Updated on

नागपूर : आपल्या फोनमधील वैयक्तिक माहिती इतर कोणीही बघू नये म्हणून आपण स्मार्टफोनमध्ये स्क्रीन लॉक, पॅटर्न लॉक लावतो. मात्र अनेकदा हे पॅटर्न लॉक आपण विसरून जातो. यामुळे अनेकांना अडचणी येऊ शकतात. मात्र आता घाबरू नका. जर  तुम्ही पॅटर्न विसरला असाल आम्ही तुम्हाला फोन अनलॉक करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. चसला तर मग जाणून घेऊया.   

Android device Manager

Android device Manager च्या माध्यमातून तुम्ही तुमचं  स्क्रीन लॉक ओपन करू शकता. हे तुमच्या गुगल अकाउंटसोबत कनेक्ट असतं. जर तुम्ही तुमच्या फोनचं स्क्रीन लॉक विसरला असाल तर आधी कुठल्याही दुसऱ्या स्मार्टफोनवरून तुमच्या गुगल अकाउंटला लॉग इन करा. यानंतर Android device Manager ओपन करून फोनला अनलॉक करा. मात्र यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक असणार आहे. 

Forgot Pattern

Forgot Pattern च्या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या फोनसाठी नवीन पॅटर्न तयार करू शकता. यासाठी तुम्हाला चुकीचं पॅटर्न किंवा चुकीचा पासवर्ड ५ वेळा एंटर करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला  Try again in 30 seconds हा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. यानंतर तुमच्या स्क्रीनवर असलेल्या होमजवळ क्लीक करा. इथे तुम्हाला Forgot Pattern चा पर्याय दिसेल. यानंतर आपली गुगल अकाउंटची माहिती टाईप करा आणि तुम्ही तुमचं पॅटर्न बदलवू शकाल. 

Factory Reset

Factory Reset मुळेही तुमची समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील सर्व डाटा गमवावा लागेल. यामुळे तुमचा फोन अगदी नवीन असल्यासारखा होऊन जाईल. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची व्हॉल्युम वाढवण्याची बटन आणि पॉवर बटण सोबत दाबून ठेवण्यासची गरज असणार आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवरील Reboot system now या पर्यायाला क्लिक करा. इथे क्लिक करताच तुमचा फोन Factory Reset मोडमध्ये जाईल. आणि यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकाल. 

Find My Mobile 

हे सर्व्हिस फक्त सॅमसंग युजर्ससाठी आहे. यामुळे तुम्ही स्क्रीन लॉक उघडू शकता. यासाठी //findmymobile.samsung.com/login.do या वेबसाईटला ओपन करा. यानंतर आपल्या सॅमसंग अकाउंटनं लॉग इन करा. यानंतर Lock my screen ओपन करून तुमचा फोन अनलॉक करा. मात्र यासाठी तुमचं सॅमसंग अकाउंट असणं आवश्यक आहे.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.