Benefits of PPF Account For Children : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PFF) ही बचतीसाठी अतिशय चांगली योजना असून या योजनेत पैशांच्या सुरक्षिततेसोबतच चांगला व्याजदरही मिळतो. या योजनेत गुंतवणुकीची रक्कम आणि मिळणारे व्याज यावरही तुम्हाला कर सवलत देण्यात येते. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या मुलाचे पीपीएफ खाते उघडायचे असेल तर ते आता सहज उघडता येईल.
पीपीएफ खाते कोणत्याही वयाच्या मुलासाठी उघडता येते. मूल मोठे होईपर्यंत पालक खात्यात गुंतवणूक करत राहू शकतात. मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, ते स्वत: खात्यात पैसे देखील जमा करू शकतात. जेव्हा मूल स्वतःची बचत करून पैसे जमा करेल, तेव्हा त्यालाही पैशाचे महत्त्व कळेल. याद्वारे मुलांच्या भविष्यात पैशाची गरज भागवता येते. तुम्हालाही तुमच्या मुलासाठी पीपीएफ खाते उघडायचे असेल , तर चला जाणून घेऊया प्रोसेस
पीपीएफ खात्याचे फायदे
पीपीएफमध्ये जी काही गुंतवणूक केली जाते, ती दीर्घकाळासाठी केली जाते. यामध्ये गुंतवणुकीची मुदत 15 वर्षे आहे. मुलाच्या लहान वयातच पालकांनी ही योजना घेतल्यास भविष्यात चांगला परतावा मिळतो. समजा जर मुल 3 वर्षांचे असेल आणि 15 वर्षांपर्यंत मुलाच्या नावाने PPF खाते उघडले असेल तर. आता जेव्हा मूल 3+15=18 वर्षांचे असेल तेव्हा या PPF वर खूप चांगला परतावा मिळेल. ज्याचा मुलाचे शिक्षण आणि इतर गरजांसाठी उपयोग होऊ शकतो.
खात्याची मुदत वाढू शकते
या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गुंतवणूकदार तिची वेळ मर्यादा वाढवू शकतात. जर तुम्ही पीपीएफ खाते पाच वर्षांसाठी उघडले असेल आणि तुम्हाला त्याची मुदत वाढवायची असेल, तर तसे करता येते. तुम्ही जास्त मुदतीत गुंतवणूक सुरू ठेवू शकतात. तुम्हाला गुंतवणूक करायची नसली तरी तुम्ही वेळ मर्यादा वाढवू शकता.
करात सूट मिळेल
या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना करात सूटही देण्यात येते. या योजनेत गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते. यामध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही करमुक्त आहे.
अर्ज कसा करायचा
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
यानंतर, तुम्हाला तेथे जाऊन पीपीएफ खाते उघडण्याचा फॉर्म घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ती अचूक भरा.
अर्जामध्ये तुमच्याकडून काही कागदपत्रेही मागीतली जातील.
अर्जाला ती कागदपत्रे जोडा आणि कर्मचाऱ्याला द्या.
यानंतर कर्मचारी अर्ज तपासेल, माहिती बरोबर आल्यानंतर तुमच्या मुलाचे खाते उघडले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
पालकांचे केवायसी तसेच त्यासोबत बाळाचा फोटो, मुलाच्या वयाचा पुरावा (आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र)
किमान आणि कमाल गुंतवणूक
PPF खाते उघडण्यासाठी, किमान पाचशे रुपयांपासून सुरुवात करून, तुम्ही जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.